शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस पाटलांचे मानधन वाढवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:23 IST

----------------------------- बसस्थानकात स्वच्छता मोहीम राबवावी अंबाजोगाई : शहरातील बसस्थानकात गत काही दिवसांपासून कचऱ्याचे ढिगारे साचलेले आहेत. तसेच काही ठिकाणी ...

-----------------------------

बसस्थानकात स्वच्छता मोहीम राबवावी

अंबाजोगाई : शहरातील बसस्थानकात गत काही दिवसांपासून कचऱ्याचे ढिगारे साचलेले आहेत. तसेच काही ठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी साचलेले दिसत आहे. गोळा करुन ठेवलेला कचरा वाऱ्याने अस्ताव्यस्त उडत आहे. यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. बसस्थानक प्रमुखांनी याची दखल घेऊन स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

-----------------------

वाहतुकीला अडथळे

अंबाजोगाई : शहरातील बाजारपेठ भागात रस्त्याच्या कडेलाच हातगाडे उभे केले जात आहेत. त्यामुळे वारंवार वाहतूक विस्कळीत होत आहे. बसस्थानक परिसर, मंडीबाजार, शिवाजी चौक, मोंढा परिसर या भागात मोठ्या प्रमाणात हातगाडे उभे केले जात असून वाहतुकीला अडथळे निर्माण होत असल्याने हे अडथळे दूर करावेत, अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे.

-----------------------------

रस्त्यावरच भाजीपाल्याची विक्री

अंबाजोगाई : शहरातील रस्त्यावर राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूने नागरिकांना पायी ये -जा करण्यासाठी मोकळी जागा सोडण्यात आली आहे. या पादचारी पथावर फळे व भाजीपाला विक्री करणारे हातगाडे थांबत आहेत. तसेच याठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहने उभी केली जात आहेत. यामुळे नागरिकांना पादचारी पथाने ये-जा करताना अडथळा निर्माण होत आहेत.

---------------------------

फ्यूज कॉल सेंटरचे क्रमांक बंदच

अंबाजोगाई : शहरातील योगेश्वरी फिडर, मांडवा फिडर व अन्य काही फ्यूज कॉल सेंटरवरील कर्मचाऱ्यांचे फोन क्रमांक लागत नाहीत. विद्युतपुरवठा खंडित झाल्यावर ग्राहकांची गैरसोय होते. अनेकदा नागरिक वीजपुरवठा बाबत तक्रार करण्यासाठी फोन करतात. परंतु, तेथील फोन लागत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.