शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

जम्बो कोविड सेंटरमध्ये रेमडेसिविरचा तत्काळ पुरवठा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:30 IST

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहराजवळ लोखंडी सावरगाव येथे असलेल्या जम्बो कोविड सेंटरमध्ये गेल्या चार दिवसांपासून रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत ...

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहराजवळ लोखंडी सावरगाव येथे असलेल्या जम्बो कोविड सेंटरमध्ये गेल्या चार दिवसांपासून रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असून, त्याचा पुरवठा तत्काळ करण्याची मागणी आ. नमिता मुंदडा यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. लोखंडी सावरगाव येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये दोन कोविड रुग्णालये आहेत. या रुग्णालयांत जवळपास ७०० रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी बरेच रुग्ण अत्यवस्थेत आहेत. अशा रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनची अत्यंत आवश्यकता आहे. परंतु गेल्या चार ते पाच दिवसांपासून या दोन्ही रुग्णालयात रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध नाहीत. प्रशासनाने जिल्हा शल्यचिकित्सकांकडे सातत्याने मागणी करुनही त्यांनी गेल्या चार ते पाच दिवसात रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा केला नाही. त्यामुळे गंभीर रुग्णावर उपचार करतांना अडचणी निर्माण होत आहेत. या दोन्ही रुग्णालयात ७ ते २५ सीटी स्कोअर असणारी रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात असतानाही रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्यासाठी टाळाटाळ होत आहे. त्यामुळे आवश्यकता असणाऱ्या रुग्णांना चार दिवसांपासून इंजेक्शनचे डोस देता आले नाहीत. लोखंडी सावरगाव येथील दोन्ही कोविड रुग्णालयातील दाखल कोविड रुग्णांची संख्या पाहता त्वरित रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याबाबत आदेश द्यावेत, अशी मागणी आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी केली आहे. याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड, उपसंचालक, आरोग्य सेवा मंडळ, लातूर आणि जिल्हा शल्यचिकित्सकांनाही देण्यात आले आहे.