शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षतोडीकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:31 IST

-------- उन्हाची तीव्रता वाढली अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चालला आहे. परिणामी दुपारच्यावेळी रस्त्यांवर ...

--------

उन्हाची तीव्रता वाढली

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चालला आहे. परिणामी दुपारच्यावेळी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहेत. सकाळी १० वाजल्यापासून उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. सायंकाळपर्यंत उन्हाची तीव्रता कायम राहत आहे. वाढत्या उन्हामुळे थंडपेयांची मागणी व उन्हापासून संरक्षण करणाऱ्या टोप्यांची विक्री सुरू झाली आहे.

---------------

शासकीय कार्यालयात कोरोना नियमांना खो

अंबाजोगाई : कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. असे असतानाही शासकीय कार्यालयांमध्ये या नियमांचा विसर पडलेला दिसून येत आहे. शासकीय कार्यालयात असलेल्या सॅनिटायझरच्या बाटल्या रिकाम्या झाल्या आहेत. तर काही ठिकाणी अडगळीला पडलेल्या आहेत. शासकीय कार्यालयातील कर्मचारी मास्कचा वापर करत नाहीत. कार्यालयात येणाऱ्या व्यक्तीलाही मास्कचा वापर करण्यास सक्ती केली जात नाही.

----------

बँकांमध्ये गर्दी कायम

अंबाजोगाई : शहरात राष्ट्रीयीकृत बँका व खासगी बँका यांची मोठी संख्या आहे. शहरातील बँकांमध्ये पैसे भरणे, पैसे काढणे व विविध बँकेच्या कामकाजासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बँक प्रशासनाकडून कुठल्याही ठोस उपाययोजना आखल्या जात नाहीत. याशिवाय बँकेत कोरोनाविषयी अत्यावश्यक असणारे सॅनिटायझर व सामाजिक अंतराचा वापर याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. या दुर्लक्षामुळे भविष्यात कोरोनाचा धोका वाढतो की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे.

--------

उघड्या डीपींमुळे धोका

अंबाजोगाई : तालुक्यात बहुतांश ठिकाणी महावितरणच्या विजेच्या डीपी उघड्या स्थितीत आहेत. यातील अनेक डीपी सहजरित्या हाताला पोहोचतील अशा अवस्थेत आहेत. यातील अनेक डीपींचे दरवाजे तुटून वर्षानुवर्षांचा कालावधी लोटला तरी त्या डीपींना दरवाजे बसविलेले नाहीत. शेतात जाणारी लहान मुले, पशुधन हे कधीही उघड्या डीपीकडे जाऊ शकतात. याचा संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो. अशी भीषण स्थिती असतानाही महावितरणकडून याकडे दुर्लक्ष होत आहे.

-------

भाजीपालावर्गीय पिकांना फटका

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात आठवडाभरापूर्वी झालेल्या अवकाळी व वादळी पावसामुळे शेतातील पिकांसह भाजीपाल्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच दररोज असणाऱ्या ढगाळ वातावरणाचा फटका भाजीपालावर्गीय पिकांना बसत आहे. ढगाळ वातावरणामुळे भाजीपाल्यावर आळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून याचा मोठा फटका पालेभाज्यांसह फळभाज्यांना बसू लागला आहे. परिणामी बाजारातही भाजीपाल्याचे भाव कमी झाल्याचे चित्र आहे.