शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

राहायचं असेल तर मुंडेंसोबत, अन्यथा गरज नाही; मुख्यमंत्र्यांनी घेतला मेटेंचा समाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 13:20 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंबाजोगाईच्या सभेत आ. विनायक मेटेंचा समाचार घेतला. 

अंबाजोगाई (बीड ) : कोणी जर राज्यात भाजपासोबत व बीड जिल्ह्यात वेगळी भूमिका घेत असेल तर अशांनी आमच्यासोबत राहू नये. भारतीय जनता पार्टी गोपीनाथ मुंडे यांच्याशिवाय पूर्ण होत नाही. सोबत राहायचं असेल तर मुंडेंसोबत अन्यथा गरज नाही,  अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंबाजोगाईच्या सभेत आ. विनायक मेटेंचा समाचार घेतला. 

बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपा-शिवसेना युतीच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाईतील वंजारी वसतिगृहाच्या मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पालकमंत्री पंकजा मुंडे, डॉ. प्रीतम मुंडे यांच्यासह नेते उपस्थित होते. 

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना लक्ष्य केले. ते म्हणाले, अपघातापेक्षा यू टर्न घेत जे निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतात त्या शरद पवारांना आता पक्षाकडे कोणतंच काम राहिले नसल्याने ही निवडणूक जातीकडे नेत आहेत. अशा भूलथापांना लोक थारा देत नाहीत, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. जातीधर्माच्या नव्हे तर विकासावर मत मागा असा सल्लाही त्यांनी दिला. ज्यांना पंधरा वर्ष सत्तेत असूनही मराठा समाजाला आरक्षण देता आले नाही. त्यांना आपण स्वत: आरक्षण दिले. बीड जिल्ह्यात १५ वर्षात केवळ ४०० कोटी रुपये आघाडी सरकारने दिले होते. तर माझ्या चार वर्षाच्या कार्यकाळत ३७०० कोटी रुपये देण्यात आले. 

मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करू

मुख्यमंत्री म्हणाले की, मोदींच्या नेतृत्वाखाली देश स्वाभिमानाने उभा आहे. आजपर्यंत ताठ कणा असणारा पंतप्रधान नव्हता. जशास तसे ठोस उत्तर देऊन पाकिस्तानला नमविण्याची कामगिरी त्यांनी केली. मोदींच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित असून  सामान्य माणूस विकासाच्या प्रवाहात आल्याचा दावा त्यांनी केला.  महाराष्ट्राच्या राजकारणाला गोपीनाथराव मुंडे यांनी नवी दिशा दिली. त्यांचा वारसा पंकजा व प्रीतम समर्थपणे चालवत आहेत. गोपीनाथरावाचं नाव  लावण्याचा खरा अधिकार या दोघींनाच आहे. विनाकारण त्यांचं नाव लावण्यावरून राजकारण सुरू आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. मराठवाडयाचा दुष्काळ कायमस्वरूपी दूर करण्यासाठी स्वतंत्र वॉटरग्रीड तयार करून गोदावरीचे समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्याला मिळवून देण्यात येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbeed-pcबीडMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019