शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

कलेला मेहनतीची व जिद्दीची जोड असेल, तर कसल्याही व्यवसायात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:34 IST

सावरगाव : आजच्या स्पर्धेच्या युगात लाखो रुपये खर्च करून, व्यवसाय करणे अवघड झाले आहे, पण अंगात कला असेल आणि ...

सावरगाव : आजच्या स्पर्धेच्या युगात लाखो रुपये खर्च करून, व्यवसाय करणे अवघड झाले आहे, पण अंगात कला असेल आणि या कलेला मेहनतीची व जिद्दीची जोड असेल, तर कसल्याही व्यवसायाला यश मिळते, हे दाखवून दिले आहे. येथून जवळच असलेल्या श्रीपतरायवाडी या छोट्याशा खेड्यातील श्रावण प्रल्हाद तारळकर या सुशिक्षित बेकार असलेल्या युवकाने. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण घेऊन नोकरीच्या किंवा दुसऱ्या कोणत्या व्यवसायाच्या मागे न लागता, आपला पारंपरिक कुंभारीचा व्यवसाय सुरू करून आपली उपजीविका भागवू लागला. या व्यवसायात मेहनत जास्त व मोबदला कमी, तसेच बाजारात सिमेंट, लोखंड, प्लास्टीकची भांडी उपलब्ध होऊ लागल्याने, कुंभाराच्या नक्षीदार भांड्याची मागणी कमी होऊ लागली, तसेच परराज्यातील कारागिरांनी या धंद्यात शिरकाव केल्यानेही येथील कुंभाराचा पारंपरिक व्यवसाय संकटात सापडला आहे. अशा या थंडावलेल्या व्यवसायाने जीवनात निराश न होता, आपल्या पारंपरिक व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत, त्यांनी अंबेजोगाई परिसरात गणपती महालक्ष्मीच्या सणाच्या वेळी पाहणी केली. गणपती, महालक्ष्मीच्या सणाला मूर्ती व मुखवटे बाहेरून विक्रीसाठी येत आहेत. या मूर्तीची त्याने बारकाईने पाहणी करून, साचे उपलब्ध केले आपल्या तुटपुंज्या रकमेत या मूर्ती बनविण्याचा व्यवसाय सुरू केला. त्याला या तांत्रिक युगात बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागले. त्यात दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या संकटामुळेही हा व्यवसाय बराच थंडावला आहे. दोन वर्षांपासून गरिबाचा फ्रीज (माठ) ही मार्केट नसल्यामुळे विक्री झाला नाही. त्यामुळे या व्यावसायिकावर उपासमारीची वेळ आली आहे. सध्या हा कारागीर नव्या जोमाने नव्या उमेदीने महालक्ष्मी गणपती सणाला लागणारी मुखवटे, मूर्ती, खेळणी तयार करत आहे की, गणराया हे संकट तारून नेऊन परिस्थिती पूर्ववत करेल व आमच्या मूर्तींना मार्केट मिळेल, अशा प्रकारच्या आशा मनाशी बाळगून स्वतःसह कुटुंबातील पत्नी-मुले या मूर्ती बनविण्यात मग्न झाल्याचे दिसून आले.

130821\451720210804_152340.jpg~130821\451720210804_152548.jpg

पारंपारिक व्यवसायाला आधुनिकतेची जोड देऊन केला व्यवसाय सुरू~पारंपरिक व्यवसायाला आधुनिकतेची जोड देऊन केला व्यवसाय सुरु