शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

नशिबाच्या थट्टेवर माणुसकीची मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:33 IST

गेवराई : कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे गाव बंद, बाजार, दुकान, शाळा, जत्रा, उरूस बंद. जगायचं कसं, सगळ्यांनाच पडलेला प्रश्न. जत्रा, ...

गेवराई : कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे गाव बंद, बाजार, दुकान, शाळा, जत्रा, उरूस बंद. जगायचं कसं, सगळ्यांनाच पडलेला प्रश्न. जत्रा, उरूस, तमाशा, सप्ताह, नाटक यावर पोट भरणारी गावकलाकार मंडळी हतबल झाली आहेत. खायला अन्न तर लागतंय, पण आणायचे कोठून, हा प्रश्न आहे. कुटुंबातील तरणीताठी माणसं काहीतरी करून कसा तरी आपला उदरनिर्वाह भागवत आहेत, परंतु ज्या कुटुंबात चार माणसं संपूर्ण दृष्टिहीन आहेत, त्यांनी काय करायचे. या काळात न्याय कुणाकडे मागावा, हा त्यांच्यासमोर प्रश्न उभा आहे. उपासमारीची वेळ आलेल्या साक्षाळपिंपरी येथील कुटुंबाला संघर्ष धान्य बॅंकेच्या वतीने धान्याची मदत करण्यात आली.

साक्षाळपिंपरी येथील क्षीरसागर कुटुंबात एकूण सहा माणसे होती. सहाच्या सहा माणसे जन्मत:च अंध होती. मागील एक वर्षाच्या कालावधीत या कुटुंबातील दोन व्यक्तींचा दुर्दैवी अंत झाला. आता चार व्यक्ती या कुटुंबात आहेत. ही सर्व मंडळी गावातील जत्रा, उरूस, सप्ताह अशा ठिकाणी जाऊन आपली कला सादर करायची. यात काहीजण गायन करतात, तर काही उत्तम संगीत साथ देतात. त्यांची कला पाहून जत्रेतील लोकांकडून मिळणाऱ्या मदतीवर या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा, परंतु आता हे सर्व बंद झाले आहे. एक वर्षापासून या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. संघर्ष धान्य बँकेने आजपर्यंत या कुटुंबाला कठीण प्रसंगात पाच वेळा धान्य व किराणा पुरविलेले आहे. त्यामुळे संकट काळात क्षीरसागर कुटुंबाला आठवण आली. संघर्ष धान्य बँकेचे सुभाष काळे यांना सम्राट क्षीरसागर याने फोन करून ‘आमच्याकडे थोडे लक्ष द्या, आम्ही खूप बिकट अवस्थेत जगत आहोत. आमचे खाण्यापिण्याचे वांदे झाले आहेत. कृपया संघर्ष धान्य बँकेतून आम्हाला मदत करा, अशी विनवणी केली’. सुभाष काळे यांनी त्यांना मदतीचे वचन देत मादळमोही येथे संघर्ष धान्य बँकेच्या शाखेतून दोन क्विंटल धान्य रविवारी देण्यात आले. याप्रसंगी संघर्ष धान्य बँकेचे सुरेश भोपळे, सुभाष काळे, बाळासाहेब गावडे, माऊली तळेकर, मारुफ शेख, शिवाजी झेंडेकर, संजय पांढरे, धर्मराज करपे, सुरेश नवले, संजीवनी भोपळे, सुवर्णा भोपळे इत्यादी उपस्थित होते. संघर्ष धान्य बँकेत धान्य जमा करणारे दातेच आमच्यासाठी खरे परमेश्वराचे अवतार आहेत, अशी प्रतिक्रिया सम्राट क्षीरसागर यांनी व्यक्त केली, तर ‘जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे,’ या म्हणीचा प्रत्यय संघर्ष धान्य बँकेमुळे जिल्ह्यात येत आहे.

===Photopath===

180421\17422950sakharam shinde_img-20210418-wa0022_14.jpg