शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

मारहाण केल्याने हॉटेल मॅनेजरची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 00:04 IST

शहरातील एका हॉटेलवर व्यवस्थापकास हॉटेल मालकाने मारहाण केली होती. तसेच त्याच्यासोबत आर्थिक व्यावहार करु नयेत, असे जाहीर प्रकटन एका स्थानिक वृत्तपत्रातद्वारे प्रकाशित केले होते. या कारणामुळे त्या व्यवस्थापकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

ठळक मुद्देआर्थिक व्यवहार करू नयेत, असे दिले होते जाहीर प्रगटन : अपमान सहन न झाल्याने घेतला गळफास

बीड : शहरातील एका हॉटेलवर व्यवस्थापकास हॉटेल मालकाने मारहाण केली होती. तसेच त्याच्यासोबत आर्थिक व्यावहार करु नयेत, असे जाहीर प्रकटन एका स्थानिक वृत्तपत्रातद्वारे प्रकाशित केले होते. या कारणामुळे त्या व्यवस्थापकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली.भरत संपत सुपेकर (वय ३५, रा. नायगाव ता. पाटोदा हमु संत नामदेवनगर धनोरा रोड बीड) असे मयताचे नाव आहे. भरत हे गावी शेती करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मात्र, पावसाअभावी शेती पिकत नसल्याने ते कामानिमित्त बीडमध्ये संत नामदेवनगरातील असलेल्या आपल्या सासरवाडीकडील मंडळींसोबत राहत होते. नवनाथ शिराळे यांच्या बार्शी रोडवरील हॉटेलात ते व्यवस्थापक म्हणून काम करत होते.अश्विनी सुपेकर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून, गेल्या आठवड्यात परतीच्या पावसाने शेतात पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतीकामासाठी भरत सुपेकर पत्नी अश्विनी समवेत गावी गेले होते. दरम्यान १२ नोव्हेंबर रोजी सुपेकर हे परत बीडला आले होते. रोजच्याप्रमाणे कामासाठी हॉटेलवर गेले.यावेळी हॉटेल मालक नवनाथ शिराळे याने ‘तू सुटी घेतल्याने आमचे आर्थिक नुकसान झाले’ असे म्हणत मारहाण केली. त्यानंतर ते घरी परतले. त्यांच्यासोबत घडलेला सर्व प्रकार त्यांनी त्यांच्या पत्नीस सांगितला. शिराळे यांने ‘भरत सुपेकर यांच्याशी व्यवहार करु नका’ असे जाहीर प्रगटन एका स्थानिक वर्तमानपत्रात दिले होते. ते पाहून बुधवारी सकाळी भरत सुपेकर हे तणावात होते. याच नैराश्यातून त्यांनी बुधवारी दुपारी पत्नी मुलांना आणण्यासाठी शाळेत गेली तेव्हा भरत सुपेकर यांनी घरातील पत्र्याखालील आडूला नायलॉनची दोरी बांधून आत्महत्या केली.याप्रकरणी त्यांची पत्नी अश्विनी यांच्या फिर्यादीवरून नवनाथ शिराळे व अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह घेतला नव्हता ताब्यातभरत संपत सुपेकर यांनी आत्हमत्या केल्यानंतर ‘जोपर्यंत गुन्हा दाखल केला जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही’ असा पवित्रा नातेवाईंकांनी घेतला होता.अखेर पत्नी अश्विनी यांच्या फिर्यादीवरुन सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर भरत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, असा परिवार आहे.

टॅग्स :BeedबीडSuicideआत्महत्या