शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

गृहकर्ज स्वस्त, पण बांधकाम साहित्य महाग; घर घेण्याचे स्वप्न कधी पूर्ण होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:35 IST

बीड : एकीकडे शासन सर्वांना घरे देण्याची घोषणा करीत योजना राबवत असलेतरी सर्वसामान्यांना घर बांधणे कठीण झाले आहे. सिमेंट, ...

बीड : एकीकडे शासन सर्वांना घरे देण्याची घोषणा करीत योजना राबवत असलेतरी सर्वसामान्यांना घर बांधणे कठीण झाले आहे. सिमेंट, स्टील, वाळू, खडी, मजुरीचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने मागील तीन वर्षांत नवीन बांधकामांचा ओघ मंदावला आहे. विकासकांकडेही फ्लॉट, रो-हाउस, अपार्टमेंटची मागणी कमी आहे. यातच कोरोनामुळे मागील दीड वर्षात प्रत्येकाचे आर्थिक गणित बिघडल्याने प्रचंड महागाईत बांधकाम करण्याचे धाडस करणाऱ्यांचे प्रमाण कमालीचे घटले आहे. गृहकर्ज स्वस्त असलेतरी एकूण बांधकाम खर्चिक असल्याने बांधकाम अनेकांच्या घराचे स्वप्न सध्यातरी आवाक्याबाहेरच आहे. गृहकर्ज दर

स्टेट बँक ऑफ इंडिया - ६.७५

बँक ऑफ इंडिया - ६.८५

बँक ऑफ महाराष्ट्र - ६.९०

एचडीएफसी - ६.७५

आयसीआयसीआय - ६.७५

बांधकाम साहित्यांत स्वस्ताई नाहीच !

सिमेंट २०१८ २०१९ २०२० २०२१ जुलै

सिमेंट २९० ३१० ३५० ३५०

विटा ३५०० ३७०० ४२०० ६०००

वाळू ३००० ३५०० ५२०० ६०००

खडी १९०० १९०० २००० २५००

स्टील ३८०० ३९००० ४००० ५९००

----------------

विटा, वाळूचे दर दिवसेंदिवस महाग होत चालले आहे. सिमेंटचे पोते ४५० रुपयांपर्यंत खरेदी करावे लागले. मजुरीदरातही २० टक्के वाढ झाली. लोखंड ६ हजारापर्यंत घेऊन आर्थिक भार सोसत बांधकाम करत आहोत. या दरवाढीच्या नियंत्रणासाठी शासनाने लक्ष दिले तरच सामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल.

-गणेश (गोटू) संचेती, बीड

-----------

बांधकाम साहित्याचे दर दुपटीने वाढलेले आहेत. गृह कर्ज स्वस्त असलेतरी विविध कारणांमुळे सध्यातरी सामान्यांना घर बांधणे कठीण आहे. आमचेही नियोजन कोलमडले आहे.

- उमाकांत भावसार, बीड

------------

गावापासून दूर घरे स्वस्त पण जाणे येणे खर्चिक

शहरातील जागा घरे, दुकानांनी व्यापल्या आहेत. प्लॉट अथवा फ्लॅटही महाग आहेत. शहराबाहेर काही प्रमाणात प्लॉट, फ्लॅट स्वस्त आहेत. गृहकर्ज स्वस्त आहे. परंतु अंतर लांब असल्याने पेट्रोलचे भावही वाढत असल्याने येण्या- जाण्याचा खर्च वाढणार आहे.

----------

बांधकाम साहित्याचे दर मागील तीन वर्षांत ४० ते ५० टक्क्यांनी वाढले आहेत. यातच मजुरी वाढली आहे. खडी खदानीसाठी तसेच वाहतुकीसाठी लागणारा डिझेलखर्च वाढल्याने बांधकाम करणे दिव्य झाले आहे. त्याचा साहित्य विक्रीवरही परिणाम झाला आहे.

-दीपक दुग्गड, बांधकाम साहित्य विक्रेता, बीड

-------------