शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्यासाठी महिला शेतकऱ्यांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:25 IST

बीड : पीक विमा भरूनही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विम्याची रक्कम कंपनीने दिली नाही. विम्याची रक्कम देण्यात यावी या ...

बीड : पीक विमा भरूनही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विम्याची रक्कम कंपनीने दिली नाही. विम्याची रक्कम देण्यात यावी या मागणीसाठी कोरोनाचे नियम पाळत शेतकरी संघर्ष समितीचे गंगाभीषण थावरे यांनी मंगळवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले, तर गावपातळीवर अनेक गावच्या महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करत आपल्या मागण्यांचे निवेदन सरपंच व ग्रामसेवकांना दिले.

जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, मूग, उडीद आदी खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसानीचे महसूल विभागाने पंचनामेही केले होते. मात्र, विमा कंपनीकडून नुकसानभरपाई देण्यात आली नाही. यासंदर्भात गंगाभीषण थावरे यांनी अ‍ॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडियाच्या मुुंबई कार्यालयातील महाप्रबंधकांना निवेदन दिले होते. यानंतर जिल्हाभरात बोंंबाबोंब आंदोलनही केले. दरम्यान, जिल्ह्यात अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, असा शासनादेश निघाल्यानंतर शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाईही दिली. शासन नुकसानभरपाई देत असताना विमा कंपनीकडून मात्र शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास टाळाटाळ होत आहे. विमा कंपनीच्या गलथान कारभारामुळे जिल्ह्यातील शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहात आहेत. त्यामुळे धरणे आंदोलन करण्यात आले. बीड तालुक्यातील मौज, माजलगाव तालुक्यातील आनंदगाव, वडवणी तालुक्यातील कोठरबन, केज तालुक्यातील वरपगाव, अंबाजोगाई तालुक्यातील पूस, शिरुर तालुक्यातील मातोरी, आष्टी तालुक्यातील वाघोली येथे महिलांनी प्रातिनिधिक स्वरूपात आंदोलन करत आपल्या मागण्याचे निवेदन सरपंच आणि ग्रामसेवकांना दिले.

===Photopath===

010621\01_2_bed_22_01062021_14.jpeg

===Caption===

महिला शेतकरी आंदोलन खडकवाडी येथे धरणे आंदोलन सोडवताना ग्रामपंचायत पदाधिकारी