शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

गौरवास्पद ! धारूरच्या दुर्लक्षित किल्ल्याच्या प्रतिकृतीला पहिले बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 16:20 IST

राज्याच्या राजधानीत युवकांच्या ग्रुपने धारूरचा ऐतिहासिक किल्ल्याची प्रतिकृती उभारली

ठळक मुद्देप्रतिकृतीत ४० एकरवरील परिसर 

धारूर : मुंबई येथे शिवसेनाप्रमूख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमीत्त आयोजीत दुर्ग बांधणी स्पर्धेत धारूरच्या किल्ल्याच्या प्रतिकृतीची प्रथम क्रमांकावर निवड झाली. दुर्लक्षित असलेल्या या किल्ल्याची प्रतिकृती मातोश्री युवा समिती उभारली. उत्कृष्ट बांधणी असलेल्या या किल्ल्याची प्रतिकृतीही स्पर्धत अव्वल ठरल्याने किल्ल्याच्या वैभवात भर पडली आहे.

धारूर येथील ऐतीहासीक किल्ला हा मोगल साम्राज्यात महत्वाच्या स्थानी होता. यामुळे इतिहास प्रेमी आणि अभ्यासक यांचे या कडे लक्ष होते. मात्र, सर्वसोयी सुविधा आणि उत्कृष्ट बांधणी असणाऱ्या या किल्ल्याकडे पुरातत्व विभागाचे मागील १० वर्षांपर्यंत दुर्लक्ष होते. नुकतेच किल्ल्याच्या दर्शनी भागाची डागडूजी झाल्याने हा किल्ला पुन्हा प्रकाशझोतात आला आहे. दरम्यान, मुंबई येथे साहेब प्रतिष्ठानच्यावतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन व दिवाळीनिमित्त 'दुर्ग बांधणी स्पर्धा-2020' आयोजित करण्यात आली होती. यावर्षी ही स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आली. स्पर्धेचा विषय 'दुर्लक्षित किल्ले' असा होता. बोरिवलीमधील मातोश्री युवा समितीमधील युवकांनी स्पर्धेत सहभागी होत धारूरच्या ऐतिहासिक किल्ल्याची सर्व वैशिट्ययुक्त प्रतिकृती उभारली. स्पर्धेत सहभागी इतर १५ संघाने उभारलेल्या प्रतिकृती पाहिल्यानंतर परीक्षकांनी धारूरच्या किल्ल्याच्या प्रतिकृतीची प्रथम क्रमांकाने निवड केली.

प्रतिकृतीत ४० एकरवरील परिसर धारूरचा किल्ल्याची प्रतिकृती उभारण्याचे ठरवल्यानंतर समितीमधील सर्व १५ युवकांनी किल्ल्याबद्दल ऑनलाईन माहिती जमा करण्यास सुरुवात केली. तब्बल पाच आठवड्यांच्या अभ्यासानंतर प्रतिकृती उभारणे सुरु करण्यात आले. किल्ला आणि त्याच्या आजूबाजूच्या चाळीस एकरमधील परिसर त्यांनी उभारला. ही प्रतिकृती 22 * 6 फुट जागेत उभारण्यात आली आहे. यात स्वप्नील हांदे, संकेत काटे, रोहन आंबेकर, निखील खोत आदींनी सहभाग घेतला.

टॅग्स :FortगडBeedबीड