शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

पैलवानांना शासकीय मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:28 IST

बीड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटात सापडलेल्या पैलवानांना शासकीय मदत द्यावी. तसेच गावस्तरावर कुस्तीचे फड पूर्ववत सुरू करण्यात ...

बीड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटात सापडलेल्या पैलवानांना शासकीय मदत द्यावी. तसेच गावस्तरावर कुस्तीचे फड पूर्ववत सुरू करण्यात यावेत, अशी मागणी शिवसंग्रामाचे नेते सुधीर काकडे यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना बुधवारी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी अनिल घुमरे, कुस्तीगीर परिषदेचे बीड तालुकाध्यक्ष बंडू शहाणे, जब्बार शेख, शेख इसाक, मकसूद पैलवान, गोपीनाथ घुमरे, भागवतराव काकडे, आदी उपस्थित होते.

जिवाजी महाले यांना अभिवादन

बीड : शिवरत्न जिवाजी महाले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या शहरातील पुतळ्यास नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. याप्रसंगी नाभिक एकता महासंघाचे जिल्हाध्यक्ष विक्रम बिडवे, युवक जिल्हाध्यक्ष विकास काळे, नगरसेवक रवींद्र कदम, विनोद मुळूक, भास्कर जाधव, पंडित दोडके, रवी सूर्यवंशी, मुकुंद दोडके, वचिष्ट राऊत, डॉ. रमेश शिंदे, विलास सरडे, सचिन झेंडे, अशोक वैद्य, नवनाथ दोडके, जीवा वैद्य, तुषार दोडके, अमोल राऊत, संदीप सोनवणे, आदी उपस्थित होते.

संगम येथे राजमाता जिजाऊ जयंती कार्यक्रम

बीड : परळी तालुक्यातील संगम येथे राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून अ. भा. वारकरी मंडळ व सरपंच वच्छालाबाई वैजनाथ कोकाटे यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम घेण्यात आला. शिवश्री राजेभाऊ गिराम यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. प्रतिमापूजन करून मिरवणूक काढण्यात आली. छोट्या मुलींनी जिजाऊ तसेच महापुरुषांचा पोशाख परिधान करून मिरवणुकीची शोभा वाढवली.