शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मागील वर्षातील पीकविमा सरसकट शेतकऱ्यांना द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:36 IST

बीड : मागील वर्षात शेतकऱ्यांनी विविध विमा कंपन्यांकडे सुमारे ६० कोटी रुपयांचा विमा भरला होता. त्यापैकी केवळ १० टक्के ...

बीड : मागील वर्षात शेतकऱ्यांनी विविध विमा कंपन्यांकडे सुमारे ६० कोटी रुपयांचा विमा भरला होता. त्यापैकी केवळ १० टक्के शेतकऱ्यांनाच पीकविम्याची रक्कम मिळाली. उर्वरित ९० टक्के शेतकरी आजही प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पिकाचा विमा मिळवून देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ विमा रक्कम सरसकट देण्यात यावी, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केली आहे.

बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी भरघोस पीकविम्याचा पॅटर्न राबवला. हा पॅटर्न वापरण्याची चर्चा राज्याचे कृषिमंत्री करतात, तर दुसरीकडे बीडचे सत्ताधारी पीकविम्याच्या प्रश्नाकडे ढुंकूनही बघायला तयार नाहीत. कोरोनाच्या आर्थिक संकटात शेतकरी होरपळत असताना, राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक आहे. केवळ सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांच्या पदरात धोंडा पडत आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केली आहे.

मागील खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पिकाची नुकसान भरपाई मिळण्यासाठी पीकविमा भरला. विमा कंपनीने ऐनवेळी नुकसानीचे फोटो कंपनीच्या पोर्टलवर अपलोड करण्याची सूचना केली. अचानक या धोरणामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली. ज्यांच्याकडे मोबाईलची सोय होती, अशा शेतकऱ्यांनी फोटो अपलोड केले. बाकीचे शेतकरी करू शकले नाहीत. यामुळे आज ९० टक्के शेतकरी पीकविम्यापासून वंचित ठेवण्याची मुजोरी विमा कंपन्यांनी केली आहे.

गेल्या १५ महिन्यांपासून इतर घटकांप्रमाणे शेतकरीही कोरोनाच्या लढाईत आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला आहे तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. आर्थिक नुकसानीत असताना त्यांच्या न्याय हक्काची पीकविम्याची रक्कम विमा कंपनी देत नाही व सत्ताधारी त्यांना जाब विचारत नाहीत. विमा कंपन्यांची मुजोरी व राज्य सरकारचा नाकर्तेपणा यामुळे शेतकरी बांधव भरडला जात आहे. त्यामुळे पीकविमा तत्काळ शेतकऱ्यांना देण्यात यावा, अन्यथा भाजपच्या वतीने आंदोलन केले जाईल, असा इशारादेखील जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिला आहे.