शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

महागाईमुळे सर्वसामान्य त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:35 IST

.... कारखान्यांना दिली जाणारी सबसिडी शेतकऱ्यांना द्या अंबाजोगाई : पेरणीपूर्वी शेतकऱ्यांच्या विविध समस्या मार्गी लावणे गरजेचे आहे. खत कारखान्यांना ...

....

कारखान्यांना दिली जाणारी सबसिडी शेतकऱ्यांना द्या

अंबाजोगाई : पेरणीपूर्वी शेतकऱ्यांच्या विविध समस्या मार्गी लावणे गरजेचे आहे. खत कारखान्यांना दिली जाणारी सबसिडी शेतकऱ्यांना द्यावी. पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून द्यावे. रखडलेले विविध अनुदान व विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी. रासायनिक खतांच्या किमती कमी कराव्यात. कंपन्यांना देण्यात येणारी सबसिडी शेतकऱ्यांना द्या, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिरीष मुखडे यांनी केली आहे.

-------------------------–-----

सामाजिक संस्था आर्थिक संकटात

अंबाजोगाई-: अंबाजोगाई तालुक्यात असणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था या समाजातील दानशूर व संवेदनशील व्यक्तीच्या मदतीवरच चालतात; मात्र गेल्या वर्षभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. परिणामी अनेकांचा संपर्क दुरावला आहे. तर मदत करणारे दाते ही आर्थिक संकटात सापडल्याने दातृत्वाचा झरा आटू लागल्याने अनेक सामाजिक संस्था आर्थिक संकटात सापडल्या आहेत.

----------------------------------

रस्त्यावर वाढती गर्दी

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी असतानाही अनेक युवक रात्रीच्या वेळी मोटारसायकलवर टिबलसीट बसून विविध कसरती करणे. क्रिकेट खेळणे.गाड्यांची स्पर्धा लावणे अशी स्टंटबाजी करीत आहेत. याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

-----------------------------

वाहने बंद, रोजगारासाठी जायचं कसं

अंबाजोगाई : तालुक्यातील बहुतांश लोक उदरनिर्वाहासाठी मुंबई, पुणे व विविध महानगरात रोजगारासाठी असतात; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्याने अनेक व्यवसाय बंद आहेत. गावातही हाताला काम नाही. सर्व बंद असल्याने महानगराकडेही जाता येईना. यामुळे अनेकांचे स्थलांतर थांबले आहे.