मोकाट जनावरांचा उपद्रव
शिरूर कासार : शहरात सततच मोकाट जनावरांचा त्रास होत असल्याने अनेक वेळा नगरपंचायतकडून त्याचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. यातील काही जनावरांना ताब्यात घेऊन ते संभाळी घातले असले तरी अजूनही काही मोकाट जनावरांचा उपद्रव सुरू असल्याने शहरातील या जनावरांचा पुरता बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे .
सिंदफणेच्या पाण्याचा रंग हिरवा
शिरूर कासार : तालुक्यात सर्वात मोठी समजली जाणारी सिंदफणा नदी अद्याप मोठा पाऊस झाला नसल्याने साचलेल्या खांडडोहातील पाण्याचा रंग हिरवा आहे . पाण्यात सडल्यामुळे दुर्गंधी सुटली आहे. आरोग्य धोक्यात आले आहे.
सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव
शिरूर कासार : तालुक्यात पाऊस झाल्यानंतर यंदा मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पेरा झाला ,त्याची उगवण होऊन खुरपणी सहीत मेहनत झाली मात्र ढगाळ वातावरणाने कोवळ्या रोपावर अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे .
घाणीमुळे घरोघरी माशा
शिरूर कासार : पावसाळी वातावरणामुळे माशा सध्या घरोघरी मोठ्या स्वरूपात दिसत आहेत. जेवताना एक हात माशा हाकलण्यासाठी गुंतवावा लागतो आहे . नाल्यात घाण साचल्यामुळे माशाचे प्रमाण वाढले आहे.
020721\img20210702133349.jpg
नाल्यात साचला कचरा