शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

माेर्चास विरोध करणाऱ्या गणेश बजगुडे यांना धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:25 IST

बीड : मराठा आरक्षणासाठी काढण्यात येत असलेल्या आमदार विनायक मेटे यांच्या मोर्चास का विरोध करतो? समाज माध्यमावर का लिखाण ...

बीड : मराठा आरक्षणासाठी काढण्यात येत असलेल्या आमदार विनायक मेटे यांच्या मोर्चास का विरोध करतो? समाज माध्यमावर का लिखाण करतो? असे म्हणत येथील गणेश आसाराम बजगुडे (३५, रा. खडकपुरा, पेठ बीड) यांना धक्काबुक्की करीत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली.

यासंदर्भात १ जून रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास बजगुडे यांनी पेठ बीड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास खडकपुरा येथील माझ्या घरासमोर असताना दोन दुचाकीवरून चौघे आले. आम्ही आमदार विनायक मेटे यांचे कार्यकर्ते आहोत. तू मेटे साहेबांच्या मोर्चाला का विरोध करतोस? समाजमाध्यमांवरही तू माेर्चाच्या विरोधात लिखाण करीत आहे, असे म्हणत त्यांनी शिवीगाळ केली अन् लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी देखील दिली. बजगुडे यांनी आ. मेटे यांच्या शिवसंग्राममध्ये निवडणूक काळात प्रवेश केला होता आणि काही महिन्यांतच ते बाहेर पडले होते.

मला कल्पना नाही

यासंदर्भात आमदार विनायक मेटे यांच्याशी संपर्क साधला असता, या घटनेसंदर्भात मला काहीही माहिती नाही. आज दिवसभर मी गेवराई, माजलगाव, परळी आदी भागांत मोर्चासंदर्भात जनसंपर्क करीत होतो, असे त्यांनी सांगितले.