शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा फुले जनआरोग्य योजनेमुळे ६३ जणांवर मोफत उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:24 IST

पुरुषोत्तम करवा लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : येथील ग्रामीण रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून कोरोना रुग्णांवर पंधरा दिवसांत ६३ ...

पुरुषोत्तम करवा

लोकमत न्यूज नेटवर्क

माजलगाव : येथील ग्रामीण रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून कोरोना रुग्णांवर पंधरा दिवसांत ६३ जणांवर मोफत उपचार करण्यात आले. या उपचारामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना सावकाराकडे खेटे मारण्याची वेळ आली नाही. या योजनेचा सर्वसामान्यांना लाभ मिळाल्याने या रुग्णांनी समाधान व्यक्त केले.

सर्वसामान्य नागरिकांची कोरोनामुळे पहिल्या व दुसऱ्या लाटेत खूप मोठी आर्थिक हानी झाली. पहिल्या लाटेत नागरिकांत कोरोनाची खूपच भीती होती. यामुळे नागरिक थोडेही कोरोनाचे लक्षणे दिसून आली की, औरंगाबाद, पुणे, जालना येथे उपचारासाठी जात असत. तेथे गेल्यावर पैशाअभावी खूप अडवणूक झाली. या शहरात उपचारासाठी गेलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी सावकाराकडे आपले घर, शेत गहाण ठेवले. त्यानंतर माजलगाव शहरात दोन, तीन कोविड हाँस्पिटल झाली. या हॉस्पिटलमध्ये इतर शहराच्या तुलनेत कमी पैशात चांगले उपचार होऊ लागले. यामुळे कोरोना रुग्णांना बाहेर जाऊन उपचार घ्यायची गरज पडत नव्हती.

दुसऱ्या कोरोना लाटेत माजलगाव शहरात सात ते आठ कोविड हॉस्पिटलला परवानगी मिळाली. यामुळे माजलगाव तालुक्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातील रुग्णांना माजलगाव शहरात कमी पैशात दर्जेदार सुविधा मिळाली. यामुळे दुसऱ्या लाटेमध्ये ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण निघाल्याने या रुग्णांना बाहेर जिल्ह्यातील रुग्णालयामध्ये जाऊन उपचार घ्यायची गरज पडली नाही.

त्यातच माजलगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयात १३ मे पासून कोविड हॉस्पिटल चालू केले. या रुग्णालयात एक जूनपर्यंत ६३ कोरोना रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार करण्यात आले. उपचार घेणाऱ्या रुग्णांना या ठिकाणी जेवणासह ऑक्सिजन, औषधी व रेमडेसिविर इंजेक्शन वेळेवर मिळाल्याने या ठिकाणी एकही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचे येथील डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. येथील ४१ रुग्णांवर उपचार होऊन त्यांना घरी पाठवण्यात आले, तर ८ रुग्णांना व्हेन्टिलेटरची आवश्यकता भासल्याने त्यांना अंबाजोगाईत उपचार करण्यात आल्याचे डॉ. सुरेश साबळे यांनी सांगितले.

----

माजलगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयात मोफत जेवण, उपचार चांगले मिळाल्याने आम्हाला पेरणीच्या तोंडावर आर्थिक फटका बसला नाही. यामुळे आम्ही समाधानी असल्याचे उपचार घेऊन घरी परतलेले रुग्ण सांगत होते.

----

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत जिल्हा रुग्णालय स्तरावरील व उपजिल्हा रुग्णालय स्तरावरील रुग्णालयात मोफत उपचार मिळतात. परंतु ग्रामीण रुग्णालय स्तरावर असे कोविड हॉस्पिटल मराठवाड्यात नाही, असे येथील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

---

तालुका स्तरावर व ग्रामीण रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून कोविड हॉस्पिटल मिळाल्याने व रुग्णांवर आम्हाला चांगल्या पद्धतीने उपचार करता आले. या ठिकाणी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. मोफत उपचार झाल्याने रुग्ण आनंदीत होऊन गेले.

- डॉ. सुरेश साबळे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, माजलगाव.