शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम विभागाची महिला कर्मचारी बेपत्ता

By admin | Updated: January 4, 2016 00:30 IST

पतीची तक्रार : मूळच्या लातूरच्या

वैभववाडी : येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील महिला कर्मचारी नंदना विशाल टिके (वय २६, रा. लातूर) या शनिवारी सकाळी करुळ घाटातून संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्या आहेत. दोन वर्षांच्या मुलीला पतीकडे ठेवून करुळ घाटात कामावर गेलेल्या टिके तब्येतीचे कारण सांगून घरी निघाल्या. मात्र, दुपारी ‘माझा शोध घेऊ नका’, असा दूरध्वनी केल्याचे पती विशाल टिके यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे नंदना टिके यांच्या बेपत्ता होण्यामागे गूढ असल्याचा संशय निर्माण झाला आहे. मूळच्या लातूर येथील नंदना टिके सार्वजनिक बांधकाम विभाग वैभववाडी उपविभागात २४ नोव्हेंबरला रुजू झाल्या. त्या शहरातील डांगे चाळ येथे राहतात. शनिवारी सकाळी ९.३० वाजता नंदना आपल्या दोन वर्षांच्या मुलीला पतीकडे ठेवून नेहमीप्रमाणे कामाला गेल्या. तेथून सहकारी रस्ता कामगारांसमवेत त्या करुळ घाटात कामाला गेल्या होत्या. सकाळी ११.३० च्या सुमारास येथील सार्वजनिक बांधकामचे कर्मचारी शहाबुद्दीन डांगे यांना आपली तब्येत बरी नसल्याचे सांगून त्या घाटातून निघाल्या. परंतु, नंदना यांनी घरी न येता दुपारी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून ‘माझा शोध घेऊ नका’, असे सांगितल्याचे पती विशाल टिके यांनी तक्रारीत म्हटले आहे. नंदना घरी न आल्यामुळे विशाल टिके यांनी लहान मुलीला आपल्याकडे ठेवून त्या बेपत्ता झाल्याची तक्रार रविवारी वैभववाडी पोलिसांत दिली. दरम्यान, नंदना कामावरून बेपत्ता झाल्यामुळे बांधकाम विभागाचे कर्मचारीही चिंताग्रस्त आहेत. या प्रकरणाचा तपास बी. ए. कदम करीत आहेत. (प्रतिनिधी)