शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

८० हजारांची लाच स्वीकारताना फौजदारास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:35 IST

आष्टी (जि.बीड) : एका गुन्ह्यातील आरोपीचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाकडून रद्द न करण्यासाठी एक लाखांच्या लाचेची मागणी करून ८० ...

आष्टी (जि.बीड) : एका गुन्ह्यातील आरोपीचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाकडून रद्द न करण्यासाठी एक लाखांच्या लाचेची मागणी करून ८० हजार रुपयांत तडजोडीला तयार झालेला अंभोरा (ता. आष्टी) पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. सोमवारी दुपारी त्याच्यावर अंभोरा ठाण्यातच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल पांडुरंग लोखंडे (रा. तिरुपती पार्क, पिसादेवी रोड, औरंगाबाद ) असे लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. सध्या त्याची नेमणूक अंभोरा ठाण्यात आहे. अंभोरा ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील आरोपीचा मंजूर असलेला अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाकडून रद्द न करण्यासाठी व गुन्ह्यात असलेल्या गाड्या जप्त न करण्यासाठी लोखंडेने एक लाख रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीच्या औरंगाबाद येथील पथकाने पडताळणी केली असता, त्यात तडजोडीअंती लोखंडे याने ८० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले असल्याचे सिद्ध झाले. त्याआधारे राहुल लोखंडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोनि. गणेश धोकर हे करीत आहेत.

राहुल लोखंडे झाला फरार

या प्रकरणातील आरोपी उपनिरीक्षक राहुल लोखंडे याच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच राहुल लोखंडे हा फरार झाला असून, त्याचा शोध अंभोरा पोलीस घेत आहेत, तर काही पोलीस प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी त्याला मदत करत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल होताच वाजले फटाके

राहुल लोखंडे यांच्यावर लाचेची मागणी केल्याचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती ग्रामस्थांना मिळताच त्याठिकाणी ग्रामस्थांनी फटाके वाजवून गुन्हा दाखल झाल्याचा आनंद व्यक्त केला, तसेच सखोल चौकशी करून सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

260721\26_2_bed_18_26072021_14.jpg

राहुल लोखंडे