शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

चांगल्या दरामुळे शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:32 IST

परळी : तालुक्यात शेतकऱ्यांनी खरीप पेरणीपूर्वीच्या मशागतीसह नांगरणे, मोगडणे, उन्हाळी पाळी घालणे, वेचणे ही कामे केली ...

परळी : तालुक्यात शेतकऱ्यांनी खरीप पेरणीपूर्वीच्या मशागतीसह नांगरणे, मोगडणे, उन्हाळी पाळी घालणे, वेचणे ही कामे केली आहेत. चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी सोयाबीनकडे वळले आहेत. सोयाबीनचे २९ हजार ३४७ हेक्टर क्षेत्रावर अपेक्षित पेरणी धरून तालुका कृषी कार्यालयाने नियोजन केले आहे.

गेल्यावर्षी सोयाबीन उगवणीबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्याने या हंगामात परळी तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने ३८ गावांत जाऊन घरचे बियाणे पेरणीसाठी व बीज प्रक्रिया करण्याबाबत कृषी अधिकाऱ्यांनी प्रात्यक्षिके करून दाखविली आहेत. परळी तालुक्यात एकूण लागवड क्षेत्र ६८ हजार १६३ हेक्‍टर असून, त्यापैकी खरीप हंगामात पेरणीसाठी ५५ हजार हेक्‍टर क्षेत्र उपलब्ध होईल.

सन २०२१-२२ मध्ये परळी तालुक्यात सोयाबीनचे २९ हजार ३०० हेक्टर क्षेत्र अपेक्षित आहे. गेल्या वर्षी सोयाबीनचे २५ हजार ९४० हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी होते. यंदा कापसाचे अपेक्षित क्षेत्र १४ हजार हेक्‍टर एवढे आहे. गेल्यावेळी १९ हजार ८७६ हेक्टर क्षेत्र होते. तसेच यंदा खरीप ज्वारीचे बाराशे हेक्‍टर क्षेत्र अपेक्षित आहे. मूग १२०० हेक्‍टर , तूर ४ हजार हेक्‍टर, तर बाजरीचा ९०० हेक्‍टर क्षेत्रात पेरा अपेक्षित आहे. तसेच सोयाबीन, कापूस, तूर, मूग या पिकांचा मुख्य पेरा असेल. परळी तालुक्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ज्वारी, मूग, तूर, बाजरी, सोयाबीन या पिकांचे लागवड क्षेत्र वाढ करण्याच्या दृष्टीने तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने नियोजन केले आहे.

कापूस पिकाखालील क्षेत्र हे ऊस लागवडीसाठी वाढल्यामुळे कापूस क्षेत्रात यावेळी घट होण्याची शक्यता आहे. सोयाबीन व तूर, मुगाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना बियाणे उगवणे बाबतीत गावागावांत जाऊन मार्गदर्शन करण्यात आले तसेच बोगस बी-बियाणे याबाबत भरारी पथके नेमण्यात आली आहेत. - अशोक सोनवणे तालुका कृषी अधिकारी परळी

परळी तालुक्यात शेतकऱ्यांनी शेतात नांगरणी, मोगडणे, मशागतीची सर्व पेरणीपूर्वीची कामे चालू असून, अंतिम टप्प्यात आहेत. - मनोज यस्के, शेतकरी, नागापूर.