शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतच्या आखाड्यात कुटुंब कलह; चुलत्याचा उमेदवारी अर्ज पुतण्यांनी फाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 18:32 IST

Gram Panchayat Election अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख होती

ठळक मुद्देअर्ज दाखल करणार्‍या सर्वच उमेदवारांची दिवसभर पळापळ चालू होती.धक्का-बुक्की करत हातातील अर्ज हिसकावून घेतला.

माजलगाव :  तालुक्यातील दिंद्रुड येथील ग्रांपचायतच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी काही वेळ बाकी असतांना कुटुंब कलहातून वेगळेच नाट्य रंगले. तहसिल कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या चुलत्याचा अर्ज हातातून हिसकावून घेत पुतण्याने पळ काढत तो फाडल्याची घटना बुधवारी सायंकाळी ४. ३० वाजेदरम्यान घडली.

तालुक्यात पहिल्या टप्यात पाच ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुक प्रक्रिया सुरू आहे. त्या अनुषंगाने बुधवार ( दि.३० ) रोजी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यातच ऑनलाईन अर्ज दाखल करतांना सर्व्हर डाऊन होत असल्याने निवडणूक विभागाने ऑफलाईन अर्ज स्विकारले. त्यासाठी सायंकाळी ५ वाजेपर्यंत वेळ वाढवून दिला होता. अर्ज दाखल करणार्‍या सर्वच उमेदवारांची दिवसभर पळापळ चालू होती. याच दरम्यान, सायंकाळी ४.३०  वाजता तहसिल कार्यालय आवारात दिंद्रुड ग्रामपंचायतीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी अशोक हरिनाथ कोमटवार हे आले. यावेळी त्याठिकाणी त्यांचे पुतणे अक्षय दिलीप कोमटवार, अजय दिलीप कोमटवार, अमित दिलीप कोमटवार यांनी अशोक कोमटवार यांना धक्का-बुक्की करत हातातील अर्ज हिसकावून घेतला. यानंतर तेथून पळ काढत त्यांनी अशोक कोमटवार व त्यांचा मुलगा निखिल अशोक कोमटवार यांचा उमेदवारी अर्ज फाडून टाकला. यामुळे तहसिल कार्यालयात एकच गोंधळ उडाला होता. यानंतर अशोक कोमटवार यांच्या कार्यकर्त्यांनी धाव घेतली. परत पुन्हा कागदपत्राची जमवा-जमव करत अर्ज भरला.  यावेळी त्यांना चांगलाच घाम फुटला होता. शेवटी त्यांनी वेळेत अर्ज दाखल केला.

पोलीसांची बघ्याची भुमिका, तर तहसिलदारांचे कानावर हातअर्ज फाडण्याची घटना होत असतांना समोरच उभा असलेल्या पोलीसांना अशोक कोमटवार बचावासाठी आवाज देत होते. मात्र, त्यावेळी उपस्थित पोलीसांनी याकडे डोळेझाक करून एक प्रकारे या घटनेला पाठबळ देण्याचे काम केले. तर तहसिलदार वैशाली पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी हा प्रकार तहसिल कार्यालयात झाला नसून तो बाहेर झाला असल्याचे सांगत कानावर हात ठेवले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतBeedबीडElectionनिवडणूक