शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ शिक्षकांच्या कुटुंबीयांना मिळणार ५० लाखांचे सानुग्रह अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:36 IST

अंबाजोगाई : कोविड-१९मुळे जे शिक्षक, कर्मचारी मयत झालेले असतील त्यांच्या वारसदारांनी सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी तत्काळ प्रस्ताव सादर करावा, असा ...

अंबाजोगाई : कोविड-१९मुळे जे शिक्षक, कर्मचारी मयत झालेले असतील त्यांच्या वारसदारांनी सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी तत्काळ प्रस्ताव सादर करावा, असा आदेश बीड जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांनी २१ मे २०२१ रोजी जारी केला आहे.

कोविडमुळे मयत शिक्षकांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती व गटशिक्षणाधिकारी स्तरावर लवकरात लवकर कार्यवाही करून मृत शिक्षकांच्या कुटुंबीयांना मदत व लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय रापतवार यांच्या वतीने करण्यात आली आहे.

कोरोना महामारीवर मात करण्यासाठी राज्यासह बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी आरोग्य यंत्रणांच्या मदतीला शिक्षकांची नियुक्ती केली आहे. परंतु, कर्तव्य बजावत असताना मागील एक वर्षापासून आजतागायत बीड जिल्ह्यात अनेक शिक्षक बांधव मृत्युमुखी पडले आहेत. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान न मिळाल्याने त्यांची परवड होत आहे. यामुळे या काळात कर्तव्य बजावणार्‍या शिक्षकांना 'फ्रंटलाइन वर्कर' म्हणून तत्काळ मान्यता द्यावी आणि या कुटुंबीयांना ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान मिळण्याची कार्यवाही तत्काळ करून दिलासा द्यावा, अशी मागणी रापतवार यांनी केली आहे.