शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

अति दुर्मिळ वृक्ष-वेलींचे नंदनवनात होणार जतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:21 IST

दुर्मिळ कृष्ण वडाने नंदनवनाच्या वैभवात भर शिरूर कासार : सर्पराज्ञीत गतवर्षी १ जुलैरोजी कृषी दिनाचे औचित्य साधून उभारलेल्या तीन ...

दुर्मिळ कृष्ण वडाने नंदनवनाच्या वैभवात भर

शिरूर कासार : सर्पराज्ञीत गतवर्षी १ जुलैरोजी कृषी दिनाचे औचित्य साधून उभारलेल्या तीन हजार वृक्षांच्या रामवनाचा प्रथम वर्धापन दिन दुर्मिळ, अति दुर्मिळ वृक्ष-वेलींचे नंदनवन निर्माण करून साजरा करण्यात आला. कृष्ण वडाचे रोपण विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते यांच्याहस्ते गुरुवारी करण्यात आले. कृष्ण वडाने नंदनवनाच्या वैभवात भर पडली असल्याचे सातपुते यांनी यावेळी सांगितले .

या नंदनवनाचा प्रारंभ अत्यंत दुर्मिळ असलेल्या कृष्णवडाचे विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते यांच्याहस्ते रोपण करून करण्यात आला. अत्यंत दुर्मिळ असलेली वनसंपदा दिवसेंदिवस नष्ट होऊ लागली आहे. ही वनसंपदा जतनाचे कार्य सर्पराज्ञीने नंदनवनाच्या माध्यमातून हाती घेतले आहे. असे मत अमोल सातपुते यांनी यावेळी व्यक्त केले.

अमोल सातपुते, क्षितिज हिर्लेकर, सचिन नलावडे व सर्पराज्ञीचे संचालक सिद्धार्थ सोनवणे, सृष्टी सोनवणे यांच्या संकल्पनेतून सर्पराज्ञीत एक एकर जागेत साकारत असलेले दुर्मिळ, अतिदुर्मिळ वृक्ष-वेली नंदनवनाची उत्सुकता निसर्गप्रेमींना लागली आहे.

नंदनवनामध्ये कृष्णवड, पिवळा पळस, पांढरा पळस, पांढरा पांगारा, लाल हादगा, कौशी, कोशिंब, गुलाबी बहावा, पांढरा बहावा, कैलासपती, रुद्राक्ष, गोरखचिंच, पिवळी काटेसावर, मोहा, काळीनिरगुडी, निर्मली, राळवृक्ष, वायवर्ण, कुचला, नागकेशर, लोध्र, डुक्कर कंद, महावेल, काळीगुंज, पांढरी गुंज आदी २०० अत्यंत दुर्मिळ व दुर्मिळ लोप पावत चाललेल्या वृक्ष-वेलींची लागवड केली जाणार आहे. त्यांचे संरक्षण संवर्धन आणि जतन नंदनवनात केले जात आहे. नंदनवनाच्या शेजारी पंचवटी वन तयार करण्यात आले आहे. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप शिंदे, संदीप वायबसे, सुधाकर कंठाळे, जालिंदर भसकरे आदी उपस्थित होते .

कृष्णवडाचे विशेषत्व

कृष्णवड नावाने परिचित असलेला हा वृक्ष नेहमीच्या वडापेक्षा वेगळा असून, अत्यंत दुर्मिळ आहे. या वडाची पाने निसर्गत:च द्रोणाच्या आकाराची असतात. त्याचे शास्त्रीय नाव ‘फा कृष्णि’, तर इंग्रजी नाव ‘कृष्णाज बटरकप’ असे आहे. कृष्ण यमुनातीरी या द्रोणात लोणी, रानमेवा, गोपाळकाला खात असे, अशी कथा सांगितली जाते. या वृक्षास हिंदू तसेच बौद्ध धर्म पवित्र मानतात.

सिद्धार्थ सोनवणे

(वन्यजीव अभ्यासक)

वृक्षदान, श्रमदान आणि अर्थदान रूपात दान यज्ञात सहभागी व्हा

सर्पराज्ञीत साकारत असलेल्या दुर्मिळ अति दुर्मिळ वृक्षवेलींच्या जतनासाठी तुम्हीही सहभागी होऊ शकता. तुम्ही या नंदनवनाच्या उभारणीसाठी वृक्षदान, श्रमदान, बीजदान आणि अर्थदानाची मदत करून सहभागी होऊन निसर्ग संवर्धनासाठी मदत करू शकता .

020721\img-20210701-wa0030.jpg

राम वनात कृष्ण वडाचे वैभव