शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मराठा मोर्चासाठी १२ समित्याची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:32 IST

बीड : मराठा मोर्चाची तयारी सुरू आहे. ५ जूनला बीडमध्ये मोर्चा निघणार आहे. मोर्चाच्या नियोजनासाठी १२ समित्या स्थापन करण्यात ...

बीड : मराठा मोर्चाची तयारी सुरू आहे. ५ जूनला बीडमध्ये मोर्चा निघणार आहे. मोर्चाच्या नियोजनासाठी १२ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. मोर्चात पक्ष, गटतट विसरून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार विनायक मेटे यांनी केले.

कपिलधार येथे रविवारी आमदार विनायक मेटे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. त्यानंतर मेटे यांनी बीडमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला पाहिजे. आरक्षणासाठीची भूमिका जाहीर करावी. ओबीसीप्रमाणे शैक्षणिक शुल्कात सवलती द्याव्यात. शिष्यवृत्ती सुरु करावी. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून व्यवसायासाठी ५० हजारापर्यंत भागभांडवल द्यावे. राज्य मागासवर्गीय आयोगाची पुनर्रचना करावी, आदी मागण्यांसाठी मराठा समाजाचा मोर्चा निघणार आहे. या मोर्चातून सरकारला जाब विचारला जाईल. कोरोना नियमांचे पालन करुन मोर्चा निघणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. एसईबीसीतून निवड झालेल्या उमेदवारांना तातडीने सेवेत सामावून घ्यावे, यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल करणार आहे, असेही आ. मेटे यांनी सांगितले.

यावेळी बैठकीत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक बी.बी.जाधव, ॲड. मंगेश पोकळे, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे, गंगाधर काळकुटे, सुहास पाटील, प्रा.ग़ोपाळ धांडे, महेश धांडे, अशोक सुखवसे, मनोज जाधव यांची उपस्थिती होती.

===Photopath===

230521\23_2_bed_18_23052021_14.jpeg

===Caption===

पत्रकारपरिषदेत बोलताना आमदार विनायक मेटे, ॲड.मंगेश पोकळेव मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक बीबी जाधव