शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर - जामखेड महामार्गावरील अतिक्रमणे रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:24 IST

अविनाश कदम आष्टी : तालुक्यातील अहमदनगर - कडा - आष्टी - जामखेड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६१ मधील रस्त्याच्या उजव्या ...

अविनाश कदम

आष्टी : तालुक्यातील अहमदनगर - कडा - आष्टी - जामखेड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६१ मधील रस्त्याच्या उजव्या व डाव्या बाजूस विनापरवानगी नियमबाह्य अनधिकृत असलेले अतिक्रमण प्रशासनाच्या रडारवर आली असून ते काढण्यासाठी अहमदनगर येथील राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय कार्यालयाने २ जून रोजी नाेटीस बजावल्यानंतर एकच खळबळ उडाली. चिंचपूर ते मेहकरी फाटा या ३७ किलोमीटर अंतरातील सर्व अतिक्रमणधारकांना या नोटिसा दिल्या आहेत. त्यामुळे आष्टी शहरातील दुकानदारांची दुकाने रिकामी करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.

तालुक्यातील अहमदनगर - कडा - आष्टी - जामखेड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६१ वरील रस्त्याच्या हद्दीतील अनधिकृत बांधकाम व पत्र्याचे दुकाने अतिक्रमण व विना परवानगी नियमबाह्य बांधकाम त्वरित काढण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग उपविभागाने या अतिक्रमणधारकांना तोंडी व समक्ष सूचना या अगोदर दिलेल्या होत्या. २ जून रोजी परत त्यांना लेखी नोटीस दिल्या आहेत. चिंचपूर ते आष्टी येथील अनधिकृत बांधकाम हे सरकारी जागेतील असल्याने ही नोटीस मिळाल्यापासून एका दिवसात काढून घ्यावे, अन्यथा या खात्यामार्फत सदरचे बांधकाम ३ जूनपासून काढण्यात येईल आणि त्याचा सर्व खर्च अतिक्रमणधारकांकडून वसूल केला जाणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग उपविभाग अहमदनगर येथील उपविभागीय अभियंता डी एन तारडे यांनी सांगितले.

या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवालाचे काम पूर्ण झाले असून अतिक्रमणे काढावी लागणार असून या अतिक्रमणधारकांना या अगोदर तोंडी व समक्ष सूचना दिल्या होत्या त्यांना परत बुधवारी प्रत्यक्ष लेखी नोटीस दिल्या आहेत. त्यांनी एका दिवसात आपले अतिक्रमण काढून घ्यावे नसता गुरूवार पासून अतिक्रमण काढण्यात येणार आहे.

- संतोष काळे, शाखा अभियंता,

राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, अहमदनगर.

आमच्या वडिलोपार्जित मालकी हक्कातील जागेचा ही नोटीसमध्ये अतिक्रमण असा उल्लेख केला असून मालकी हक्कातील जागेच्या बद्दल काही नमूद न करता नोटीस दिली आहे. त्यामुळे मालकी हक्कातील जागेमधील नागरिकांना नुकसान भरपाई मिळावी - कल्याण निकाळजे ,भीमनगर आष्टी.

आम्हाला नोटीस देऊन एका दिवसात दुकान रिकामी करण्याचे सांगितले आहे, एका दिवसात ते शक्‍य नाही. त्यामुळे कमीत कमी आम्हाला अजून काही दिवसांचा वेळ वाढवून देण्यात यावा . - सलीम पठाण, दुकान धारक, आष्टी.

===Photopath===

020621\img_20210602_144904_14.jpg