परळी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथे गर्दी करू नका म्हटल्याने पोलिसांशी हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोपावरून परळी शहर पोलिसांनी जनक्रांती संघटनेचे संस्थापक बबन गीतेंसह दहा जणांना गुरुवारी दुपारी अटक केली.
परळी पंचायत समितीच्या सभापती ऊर्मिला गीते यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल होणार असल्याने बबन गीते यांच्या घरासमोर गुरुवारी समर्थकांची गर्दी झाली होती. यावेळी तेथे पोहोचलेले उपविभागीय अधिकारी सुनील जायभाये व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी गर्दी करू नका, असे म्हटले. त्यावरून गीते यांनी हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा आणला, अशी तक्रार पोलिसांनी केल्याने ही कारवाई करण्यात आली. गीते यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.