बीड : जिल्ह्यात सध्या कोरोना लसीकरणाची गती अतिशय संथ असल्याचे दिसते. राज्य स्तरावरून लस मिळत नसल्याने १८ ते ४५ वयोगटातील लसीकरण ठप्प आहे, तर केंद्राकडूनही अपुरी लस येत असल्याने ज्येष्ठांनाही प्रतीक्षा करावी लागत आहे. या संथ गतीमुळेच आतापर्यंत केवळ १४ टक्के लसीकरण झाले आहे. अद्यापही १७ लाख लोकांना लसीची प्रतीक्षा आहे. आरोग्य विभागाकडून आलेले डोस देताना गर्दी होणार नाही, यासाठी ऑनलाइन नोंदणीची सुविधा केली आहे; परंतु यामुळे लसीकरण कमी होत आहे. त्यामुळे यात आणखी सुधारणा करण्याची गरज आहे.
७१ केंद्र
जिल्हा, उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालयांसह प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात लस दिली जाते.
सुरुवातीला १४३ केंद्र होते; परंतु १८ ते ४५ वयोगटातील लसीकरण बंद झाले.
त्यामुळे आता लसीकरण केंद्रांची संख्या ७१ आहे. ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली जाते.