शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शेततळ्यांमुळे पडीक शेती झाली हिरवीगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कडा : कायम दुष्काळी भाग असलेला आष्टी तालुक्यात कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी शेततळ्यांची निर्मिती केली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कडा : कायम दुष्काळी भाग असलेला आष्टी तालुक्यात कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी शेततळ्यांची निर्मिती केली आहे. यामुळे तालुक्यातील पाच हजार हेक्टरवरील पडीक शेती फुलली आहे. या शेतीत शेतकरी भाजीपाला, फळबाग व हंगामी पिके घेत आहेत.

जिथे पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागायची तिथे शेतीला पाणी आणायचे कुठून? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर होता. पावसाचे प्रमाण कमी होत गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता. फळबाग शेती व हंगामी पिके घेताना पाण्याची चिंता भेडसायची. पण कृषी विभागाच्या योग्य सल्ल्याने तालुक्यात २२९१ शेतकऱ्यांनी शेततळी खोदले. या माध्यमातून शाश्वत शेती करण्यासाठी शेतकरी पुढे सरसावला आहे.

आष्टी तालुक्यातील शेतकरी हंगामी पिकाला महत्त्व देत. कृषी विभागाने वेळोवेळी शेततळ्यांबाबत जनजागृती केली. विविध योजनेच्या माध्यमातून शेततळी खोदून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. मागील पाच वर्षांत तालुक्यात २२९१ शेततळे शेतकऱ्यांनी खोदले. पावसाळ्यातच ही शेततळे भरून ठेवले जात आहेत. उन्हाळ्यात या पाण्याचा इतर पिके व फळबागांसाठी वापर केला जातो. यातून पाच हजार एकर क्षेत्रावर फळबागांची जोपासना झाली आहे. एरवी पाण्याअभावी फळबागा जळून जायच्या; पण आता पाण्याअभावी फळबागांना कसलीच भीती राहिली नाही.

......

भविष्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर शेततळे खोदून पाण्याचा साठा ठेवावा. या पाण्याचा वापर शेतीसाठी करावा. यातून आर्थिक उन्नती साधावी. पावसाळ्यात शेततळी भरून घ्यायला हवीत. कृषी विभागाचे वेळोवेळी सहकार्य आहेच. काही अडचण भासल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाचा सल्ला घ्यावा.

- राजेंद्र सुपेकर, तालुका कृषी अधिकारी, आष्टी.

.....

दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली शेततळे उभारले आहे. आज शेतीला कसलीच पाणी टंचाई भासत नाही. भरपूर पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे माझी शेती चांगली बहरली आहे.

- रामदास बांगर, शेतकरी, मातावळी, ता. आष्टी.

.....

शेततळ्यांची संख्या

सामूहिक शेततळे - ४७५

अस्तरीकरणासहित शेततळे - ३८

फक्त अस्तरीकरण शेततळे - ४१

फक्त खोदकाम केलेले शेततळे - ४७६

मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत शेततळे - १२६१