शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:35 IST

बीड : शेतकऱ्यांनी मागच्या वर्षीच्या पीक कर्जाची परतफेड ३१ जुलै २०२१ पूर्वी करून डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा ...

बीड : शेतकऱ्यांनी मागच्या वर्षीच्या पीक कर्जाची परतफेड ३१ जुलै २०२१ पूर्वी करून डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी केले आहे.

जिल्हा मध्सवर्ती बँक, व्यापारी बँकामार्फत शेतकऱ्यांना पीककर्ज पुरवठा करण्यात येतो. राज्यात एप्रिल व मे २०२१ मध्ये उद्भवलेल्या कोविड-१९ संसर्गाच्या परिस्थितीमुळे लागू केलेल्या टाळेबंदीच्या कालावधीत शेतकऱ्यांना शेतमालाच्या विक्री व्यवस्थेतील अडचणी आणि साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना अद्याप देय असलेली एफआरपी विचारात घेता १ जुलै २०२१ रोजीचे शासन निर्णयाद्वारे राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, व्यापारी बँकानी शेतकऱ्यांना सन २०२०-२१ या वर्षात दिलेल्या पीक कर्जाच्या वसुलीस ३१ जुलै २०२१पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या वाढीव मुदतीत पीककर्जाची परतफेड करणारे शेतकरी डॉ. पंजाबराव व्याज सवलत योजनेचा लाभ मिळविण्यास पात्र असतील.

सर्व पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या गत वर्षी घेतलेल्या पीककर्जाची परतफेड ३१ जुलै २०२१पर्यंत संबंधित बँक शाखेमध्ये करावी अन्यथा ३१ जुलै २०२१ नंतर त्यांचे पीक कर्ज खाते थकबाकीमध्ये गेल्यास अशा कर्ज खात्यावर ९ ते १२ टक्के एवढ्या जादा दराची आकारणी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी ठोंबरे यांनी केले आहे.