शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
7
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
8
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
9
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
10
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
11
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
12
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
13
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
14
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
15
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
16
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
17
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
18
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
19
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
20
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल

कमी टक्क्यांत कर्जाचा मेसेज आला म्हणून ॲप डाऊनलोड करू नका - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:35 IST

बीड : ठकसेनांकडून अनेक प्रकारच्या आमिषाचे जाळे टाकून लुटले जाते, हे फसल्यानंतरच कळते. तुम्हाला अमुक रकमेचे कर्ज मंजूर ...

बीड : ठकसेनांकडून अनेक प्रकारच्या आमिषाचे जाळे टाकून लुटले जाते, हे फसल्यानंतरच कळते. तुम्हाला अमुक रकमेचे कर्ज मंजूर झाले आहे. त्यासाठी तुम्ही पात्र ठरला आहात. केवळ काही सोपस्कार पूर्ण केले की, थेट कर्जाची रक्कम तीही कमी व्याजदरात तुमच्या खात्यात जमा होईल, अशी बतावणी केली जाते. कर्जही देण्यात येते. मात्र, एकदा या जाळ्यात फसलो की, नंतर ठकसेनांकडून कर्जदाराच्या बँक खात्यासह त्याच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर केल्याचे प्रकार घडत आहेत.

काही प्रकरणात तुम्ही कर्ज घेताना या अटीशर्ती मंजूर केल्या आहेत. त्यामुळे व्याजासाठी मनमानीदेखील केली जाते. ५० हजारांच्या रकमेसाठी जवळपास तितकेच व्याज आकारले जाते. कायदेशीर कारवाईची धमकीदेखील जाते. कंपनीचा वकील बोलतोय, असे सांगून दबाव टाकण्यात येतो. अगतिकतेचा फायदा घेऊन पैसे उकळण्याचा धंदा सध्या सोशल प्लॅटफाॅर्मचा वापर करून सुरू आहे, तर काही ॲप डाऊनलोड करून बँक खात्याची माहिती भरल्यास त्यावरील पैसेदेखील गायब झाल्याचे समोर आले आहे.

ही घ्या काळजी

१. मोबाइल ॲपवरून कुणीही कर्ज घेण्याचा प्रयत्न करू नये. त्यातून फसवणूक होण्याची शक्यता असते.

२. कोणतीही संस्था कर्ज देण्यासाठी पूर्ण प्रक्रिया करून घेते. सहज कुणी काही देत नाही.

३. कर्ज देण्यासाठी जी वैयक्तिक माहिती घेतली जाते त्याचा गैरवार केला जाऊ शकतो.

ॲप डाऊनलोड करताना खात्यावरची रक्कम साफ

कर्ज मंजूर झाले असून, ते घेण्यासाठी ॲप डाऊनलोड करा, लिंकवर माहिती पाठवा, अशी भुरळ घातली जाते. बँक खात्याची डिटेल्स घेऊन असलेली रोकड काढून घेण्यात येते.

बँक खात्यात पैसाच नाही, ठग काय करणार, या भ्रमात राहू नका. इतर ठिकाणावरून चोरलेला पैसा तुमच्या खात्यात ठेवू शकतात.

सहज कर्ज मिळवणेदेखील धोक्याचे ठरू शकते. अटी आणि शर्तींच्या नावावर कायद्याचा धाक दाखवून लुटलेदेखील जाते.

या आमिषांपासून राहा सावधान...

कुठल्याही गॅरंटीशिवाय प्रत्यक्ष भेटीगाठी न घेता फक्त पॅनकार्ड, आधार कार्ड व बँक डिटेल्स वरून कर्ज मिळते.

काही सोपस्कार न करता सहज कर्ज मिळत आहे. हे पाहून गरज नसताना त्याला बळी पडू नका.

कर्ज देताना कमी व्याजदराचे आमिष दिले जाते. नंतर चक्रवाढ व्याज लावून लूट केली जाते.

यांच्याप्रमाणे तुम्हीही फसू शकता

केस १ : एका व्यक्तीला एका ॲपवरून लोन घेण्यासंदर्भात मेसेज आला. त्यानंतर त्याने सर्व माहिती देऊन लोन घेतले; परंतु वेळेवर ते वापस देणे जमले नाही. त्यामुळे त्या कंपनीकडून संबंधिताकडे लोन असल्याचे व ते तुमचे मित्र आहेत का, असे संदेश त्याच्या मित्र यादीतील सर्वांना टाकले. त्यामुळे मानहानीदेखील या कंपन्यांकडून केली जाते.

केस २ : तुम्हाला कमी व्याजदरावर कर्ज दिले जाते, असे सांगून व्याजाची रक्कम आधीच कपात करून पैसे खात्यावर टाकले जातात. यावेळी घेतलेल्या बँक खात्याच्या माहितीचा गैरवापरदेखील केला जातो. त्यामुळे आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता असता.

सहजासहजी कर्ज मिळत नाही

कोणतीही वित्त संस्था किंवा बँक फोन कॉलवरून व्यवहार करत नाही. ग्राहकाची पुरेपूर माहिती असेल, तरच कर्ज दिले जाते. त्यामुळे या सर्व बाबी लक्षात घ्याव्यात. असे व्याजाच्या पैसे घ्या म्हणून मेसेज आले तर, सर्वांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.