शहरं
Join us  
Trending Stories
1
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
2
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मध्यस्थीसाठी विनंती
3
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
4
जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक, भारताशी आहे खास कनेक्शन
5
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
6
नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल
7
धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...
8
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
9
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
10
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
11
रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला...
12
काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना...
13
'जिओ माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका होता'; अंबानींनी का घेतली अब्जावधींची रिस्क? वाचा Inside Story!
14
'तुमच्या मदतीची गरज नाही...', पुतिन यांनी काय ऑफर दिली? डोनाल्ड ट्रम्प यांचा स्पष्ट नकार
15
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
16
Jalgaon Teacher Suicide: खळबळजनक! जळगाव येथील एका शिक्षकाची शाळेच्या वर्गातच आत्महत्या
17
CSK स्टार मुरली विजय दिग्गज क्रिकेटपटूच्या लेकीला करतोय डेट? Viral Photo मुळे चर्चांना उधाण
18
Kalidas Din 2025: करंगळीच्या बाजूच्या बोटाला 'अनामिका' नाव मिळण्यामागे आहे कालिदासांचा संदर्भ!
19
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
20
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?

न्यायालय आदेशाचे पालन होईना !

By admin | Updated: September 1, 2014 01:09 IST

बीड : माजलगाव नगर परिषद अंतर्गत काम करणाऱ्या सफाई कामगारांचे फरक वेतन द्यावे, असे आदेश औरंगाबाद कामगार न्यायालयाने दिले होते़

बीड : माजलगाव नगर परिषद अंतर्गत काम करणाऱ्या सफाई कामगारांचे फरक वेतन द्यावे, असे आदेश औरंगाबाद कामगार न्यायालयाने दिले होते़ मात्र या आदेशाचे पालन केले जात नसून त्यांना अद्यापपर्यंत वेतनातील फरक मिळालेला नाही़माजलगाव येथील नगर परिषद सफाई कामगारांना वेतनातील फरक मिळत नसल्याने त्यांनी औरंगाबाद येथील कामगार न्यायालयात धाव घेतली होती़ तेथे दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून घेऊन कामगार न्यायालयाने मागील नऊ महिन्यातील वेतन फरक देण्यात यावा, असे आदेश दिले होते़ हे आदेश देऊन महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे तरीही या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ होत आहे़न्यायालयाच्या आदेशाचे पालन होत नसल्यामुळे सफाई कामगार आता आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत़ वेतनातील फरक मिळेपर्यंत काम करणार नसल्याची भूमिका सफाई कामगार घेणार आहेत़ तात्काळ निर्णय झाला नाही तर सप्टेंबर महिन्यापासून आमरण उपोषण करण्याचा विचार त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रकात नमूद केला आहे़ १ जानेवारी २०१४ रोजी उपोषणाला बसला होतो त्यावेळी माजलगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी दोन महिन्यात पगार देऊ, असे आश्वासन दिले होते़ त्यानंतर केवळ एकच महिन्याचे वेतन देण्यात आले़ दुसरा पगार आजपर्यंत देण्यात आलेला नाही़ लेखी आश्वासन देऊन आमचा विश्वासघात केल्याचा आरोप कामगारांनी केला आहे़ आम्हाला ११ महिन्यांचा पगार व न्यायालयीन आदेशानुसार वाढीव फरक देण्याची मागणी त्यांनी दिलेल्या पत्रकात केली आहे़या निवेदनावर रंगनाथ बोराडे, राहीबाई जाधव, लंकाबाई शिंदे, अनिता डोळस, गौळणबाई घडसे, वसत्लाबाई बोराडे, रुक्मिणबाई उजगरे, शशिकला लोंढे, सागरबाई पंडित यांच्या स्वाक्षऱ्या आहेत़ माजलगावच्या मुख्याधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही़ (प्रतिनिधी)