बीड : नगरपरिषदेस शासनाच्या दलित वस्ती, दलित्तेतर व वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला निधी पूर्वी न. प. बीडकडे वर्ग करण्यात आला होता. परंतु बेकायदेशीर पणे पालकमंत्री व स्थानिक आमदार यांच्या राजकीय दबावापोटी कायद्याची चौकट मोडून हा निधी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील इतर काही नगरपालिकेस असे केले नाही, परंतु जाणीवपूर्वक बीड न. प. सोबत असे करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक विकासकामे थांबलेली आहेत. नागरिकांना यामुळे त्रास होत आहे. याच मुद्द्यावरून नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर व नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत हा प्रकार निदर्शनास आणून दिला. योग्य ती कार्यवाही करून यावर लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्यात करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
निधी वळविल्याने कामे खोळंबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:40 IST