शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या आगमनामुळे अंबेजोगाईत छत्र्यांना मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबेजोगाई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार या वर्षी सर्वत्र चांगला पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तविला आहे, तर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबेजोगाई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार या वर्षी सर्वत्र चांगला पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तविला आहे, तर काही भागांत अतिवृष्टीचा इशारा दिल्याने नागरिकांनी छत्री खरेदीसाठी दुकांनात धाव घेतल्याचे दिसत आहे. त्यातच पावसाने अंबेजोगाई व परिसरात जोरदार सलामी दिल्याने, ग्रामीण भागातील ग्रामस्थांची शहरात खरेदीसाठी गर्दी होत आहे. या वर्षी छत्र्या महागल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला चांगलीच आर्थिक झळ बसू लागली आहे.

अंबेजोगाईच्या बाजारपेठेत १०० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत छत्रीचे भाव आहेत. काही ग्राहक किंमत कमी करण्यासाठी दुकानदारांशी घासाघीस करताना दिसत आहेत. तीन फोल्डपासून ते लांब दांड्यांच्या रंगीबेरंगी विविध आकारांतील आणि आकर्षक डिझाइन असलेल्या छत्र्यांनी दुकाने सज्ज झाली आहेत. जूनच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात शालेय वस्तू, प्लास्टीक कापड, रेनकोट आणि छत्र्या खरेदीसाठी गर्दी होत असते. मात्र, अद्याप शाळा बंदच असल्यामुळे शालेय वस्तू खरेदीसाठी कमी गर्दी दिसत आहे. मात्र, बच्चे कंपनी नव्या छत्रीसाठी हट्ट करताना दिसत आहेत.

दुकानांमध्ये विक्रीसाठी विविध प्रकारच्या छत्र्या आल्या असून, लहान मुलांच्या छत्र्यांमध्ये विविध आकार उपलब्ध आहेत. या छत्र्यांवर कार्टून, विविध प्राण्यांचे फोटो, चित्रे असून, त्या लहान मुलांचे लक्ष वेधून घेत आहेत. लहान मुलांच्या छत्र्यांमध्ये लांब दांड्याच्या आणि कलरफुल छत्र्यांना जास्त मागणी आहे. लेडीज छत्रीत वेगवेगळे प्रकार खूप आहेत. तीन व चार फोल्डच्या छत्र्याही बाजारात आल्या आहेत. मात्र, ग्रामीण भागातील जोरदार पाऊस आणि वाऱ्यांमुळे त्या टिकत नसल्याने त्यांना फारशी मागणी नाही.

....

मजबूत छत्र्यांना पसंती

लोखंडी लांब दांड्याच्या छत्र्या काहीशा महाग आहेत. १५० ते २५० रुपये त्यासाठी मोजावे लागत आहेत. मात्र, त्या मजबूत असल्याने त्यांना पसंती मिळत आहे. महिलांसाठी तीन फोल्ड ११० ते १५० रुपये, डबल कोटिंग १०० ते २०० रुपये, लहान ८० ते १५० रुपये, फोल्डिंग छत्री २५० ते ३०० रुपये, लांब दांडी १०० ते २०० रुपयांपर्यंत मिळत आहेत.