शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कुंडलिका उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:33 IST

धारूर : कुंडलिका मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून तेलगाव नित्रुड, लोणवळ तलावातून जलवाहिनी प्रवाहात काढून या गावातील जमिनीसाठी सिंचनाचा लाभ ...

धारूर

: कुंडलिका मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून तेलगाव नित्रुड, लोणवळ तलावातून जलवाहिनी प्रवाहात काढून या गावातील जमिनीसाठी सिंचनाचा लाभ पूर्ववत तत्काळ द्यावा नसता २५ जानेवारीपासून तेलगाव येथील पाटबंधारे कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह उपोषणाचा इशारा विठ्ठल लगड व ५० शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

कुंडलिका मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून तेलगाव, लोणवळ, नित्रुड या गावच्या हेडपासून टेलपर्यंत जमिनी सिंचनाखाली येतात. मात्र या शेतकऱ्यांना सात वर्षांपासून पाण्याचा लाभ देणे बंद असल्याने पिके व शेती अडचणीत आली आहे. कॅनलवर अनधिकृत विद्युत मोटारी मोठ्या प्रमाणात असल्याने या शेतकऱ्यांना कॅनलच्या पाण्याचा फायदा होत नाही. या शेतकऱ्यांच्या जमिनी कंमाडमध्ये येत असल्याने जमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार करताना आर्थिक भुर्दंड या शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. याबाबत यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्यामुळे या जमिनी ओलीतापासून व कॅनलच्या पाण्यापासून वंचित राहत आहेत. पाण्याचा लाभ तत्काळ द्यावा नसता २५ जानेवारीपासून उपोषणाचा इशारा विठ्ठल लगड, विष्णू लगड, नवनाथ चव्हाण, धोंडीराम चव्हाण, संतोष लगडसह पन्नास शेतकऱ्यांनी दिला आहे.