शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेकडून निराधारांचे अनुदान वाटपास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:25 IST

तहसीलने धनादेश देऊनही चार महिन्यांपासून वाटपच नाही माजलगाव : बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या येथील शाखेत तहसील कार्यालयाने फेब्रुवारी-मार्च ...

तहसीलने धनादेश देऊनही चार महिन्यांपासून वाटपच नाही

माजलगाव : बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या येथील शाखेत तहसील कार्यालयाने फेब्रुवारी-मार्च महिन्याचे तब्बल दीड महिन्यांपूर्वी, तसेच एप्रिल-मे महिन्यांचे अनुदानाचे धनादेश दिलेले असतानाही अद्यापपर्यंत त्याचे निराधारांना वाटप करण्यात आलेले नाही. त्यामुळे निराधारांवर उपासमारीची वेळ आली असून, अनुदान त्वरित वाटप करावे, अशी मागणी होत आहे.

वृद्ध, गरीब, अपंग, संजय गांधी, इंदिरा गांधी निराधार, वृद्धापकाळ अशा विविध योजनेंतर्गत राज्य सरकारने वाटपासाठी दिलेले धनादेश व याद्या येथील बीड जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा स्वीकारण्यास नकार देत असल्याने मागील काही महिन्यांपासून निराधारांची हेळसांड होत होती. फेब्रुवारी व मार्च महिन्यांत भारतीय स्टेट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, भारतीय पोस्ट खाते, व जिल्हा मध्यवर्ती बँकेत तहसील कार्यालयाने पात्र लोकांच्या याद्या व रकमेचे धनादेश दिले. ते इतर सर्व बँकांनी स्वीकारून वाटपही केले. मात्र, येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने तहसीलचा धनादेश व याद्या स्वीकारल्या नव्हत्या. कोविडमुळे काही झाल्यास जबाबदार कोण असे बँकेच्या वतीने सांगून फेब्रुवारी व मार्च महिन्यांचे धनादेश स्वीकारले नव्हते. त्यामुळे १० एप्रिल रोजी तहसीलदार वैशाली पाटील या निराधार कक्षाचे नरेंद्र रूपदे यांच्यासमवेत मध्यवर्ती बँकेच्या शाखेत गेल्या. तेथे व्यवस्थापक डी. के. शिंदे यांना ताकीद देऊन निराधारांना पैसे वाटप करण्याचे बजावले होते. त्यानंतर लॉकडाऊन सुरू झाले तरी निराधारांच्या हातात दमडीदेखील न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारी होत आहे.

तहसील कार्यालयाने एप्रिल-मे महिन्यांचे अनुदानही जिल्हा बँकेकडे वर्ग केलेले असताना बँकेतून अनुदान वाटप होत नसल्याने ते त्वरित वाटप करावे, अशी मागणी होत आहे. जिल्हा बँक माजलगाव शाखेत वृद्ध, गोरगरीब, अपंग, संजय गांधी, इंदिरा गांधी निराधार, वृद्धापकाळ सहायता योजनेतील जवळपास चार हजार लाभार्थ्यांचे खाते आहेत.

बँकेत खात्यात पैसे जमा असून, लॉकडाऊन व कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने तहसीलदार यांनीच नंतर वाटप करण्याचे सांगितले होते, आता लवकरच वाटप सुरू करू.

- डी. के. शिंदे, बँक व्यवस्थापक, माजलगाव शाखा