शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मृत्युसत्र थांबेना; आरोग्य विभाग सुस्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:32 IST

बीड : कोरोनाबाधितांचे मृत्युसत्र सुरूच आहे, तरीही आरोग्य विभाग केवळ बैठका आणि आढावा घेतल्याचे सांगत उपाययोजना करण्यात सुस्तच असल्याचे ...

बीड : कोरोनाबाधितांचे मृत्युसत्र सुरूच आहे, तरीही आरोग्य विभाग केवळ बैठका आणि आढावा घेतल्याचे सांगत उपाययोजना करण्यात सुस्तच असल्याचे दिसत आहे. रविवारी जिल्ह्यात चोवीस तासांतील २३ व जुन्या १९ अशा ४२ मृत्यूची नोंद झाली. तसेच नवे ९६२ रुग्ण निष्पन्न झाले. ९७४ रुग्णांनी कोरोनावर मात केली.

जिल्ह्यात शनिवारी तब्बल ८ हजार ९२९ जणांची चाचणी केली गेली. त्याचे अहवाल रविवारी दुपारी प्राप्त झाले. यात ९६२ नवे रुग्ण आढळले, तर ७ हजार ९६७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. नव्या बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात ६४, आष्टी ८३, बीड २६८, धारुर ८१, गेवराई ८८, केज ८९, माजलगाव ४७, परळी २६, पाटोदा ७८, शिरूर १०९ व वडवणी तालुक्यातील २९ जणांचा समावेश आहे. तसेच ९७४ जण दिवसभरात कोरोनामुक्त झाले. दरम्यान, मागील चोवीस तासांत २३ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला, तर जुन्या परंतु पोर्टलवर अपडेट झालेल्या १९ अशा एकूण ४२ मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली. आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ८१ हजार १८४ झाली असून, कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा ७३ हजार ५२२ इतका झाला आहे. आतापर्यंत १८६१ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. सध्या ५ हजार ८०१ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती सीईओ अजित कुंभार, डीएचओ आर. बी. पवार, जिल्हा साथरोग अधिकारी पी. के. पिंगळे यांनी दिली.

बैठका नको, उपाययोजना करा!

जिल्ह्यात दररोज कोरोनाबळी वाढत आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक त्यांची यंत्रणा केवळ हे मृत्यू रोखण्यात अपयशी ठरल्याचे दिसत आहे. नुसत्या बैठका आणि आढावा घेतल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात उपाययोजना होत नसल्याचे मृत्युसत्र थांबत नसल्याचे दिसते. त्यामुळे उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

निष्क्रिय कारभारामुळे महसूलची यंत्रणा कार्यान्वित

जिल्हा रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे ढिसाळ नियोजन आणि निष्क्रिय कारभारामुळेच जिल्हाधिकारी यांनी स्वत:ची यंत्रणा रुग्णालयात कामाला लावली आहे. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार स्वत: रोज आढावा घेऊन सूचना करत आहेत. विशेष म्हणजे सूचना करूनही यात सुधारणा केल्या जात नाहीत. त्यामुळे सीईओंनीदेखील आपली जिल्हा परिषदेची यंत्रणा कामाला लावली आहे.