शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

चहाच्या गाड्यावर गर्दी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:26 IST

सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील सार्वजनिक शौचालयांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी दरवाजे व खिडक्या ...

सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील सार्वजनिक शौचालयांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी दरवाजे व खिडक्या तुटून पडल्या आहेत. यामुळे नागरिकांची मोठी कुचंबणा होत आहे. नगर परिषदेने लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या शौचालयांची मोडतोड होत आहे. तसेच शौचालयांची स्वच्छता वारंवार होत नसल्याने वाढत्या दुर्गंधीमुळे तिकडे जाणे टाळले जाते. स्वच्छता विभागाने याकडे लक्ष देऊन शौचालयांची दुरवस्था दूर करावी, अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे.

महिला बचत गट आर्थिक संकटात

अंबाजोगाई : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील अनेक महिलांनी बचत गटांची स्थापना केली. परंतु आर्थिक पाठबळ उपलब्ध होत नसल्याने स्वयंरोजगार उभारण्यासाठी महिला बचत गटांना विविध अडचणींचा मोठा सामना करावा लागत आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून काही वस्तू तयार करण्यात आल्या. तर त्या वस्तूंना योग्य बाजारपेठही उपलब्ध होत नसल्याने वस्तूंची विक्री रखडते व मोठ्या प्रमाणात भांडवल अडकून पडते. यामुळे महिला बचत गट आर्थिक संकटात सापडले आहे.

शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील शेकडो शेतकरी अद्यापही शासनाच्या कर्जमाफी योजनेपासून वंचित आहेत. दोन लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे. २७ डिसेंबर २०१९ रोजी राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली होती. यामध्ये शेतकऱ्यांना टप्याटप्याने कर्जमाफी मिळणार होती. परंतु मध्यंतरीच्या कोरोनाच्या उद्भवलेल्या संकटामुळे ही योजना लांबली. याचा मोठा फटका अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. या वंचित शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. संतोष लोमटे यांनी केली आहे.

तंटामुक्त गाव समित्या कागदावरच

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील अनेक गावांना महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम पुरस्कार प्राप्त झाला आहे. मात्र, पुरस्कार प्राप्त झालेल्या गावांमध्ये अनेक वाद विवाद उद्भवत आहेत. तसेच तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवैध धंदे सुरू असल्याने तंटामुक्त समितीचा बोजवारा उडत आहे. तंटामुक्त समितीमध्ये निवड होण्यासाठी चढाओढ लागते. परंतु प्रत्यक्ष कामाकडे मात्र, या समितीतील सदस्यांचे दुर्लक्ष होत आहे.

निवडणुकीमुळे जेवणावळी वाढल्या

अंबाजोगाई -: ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर होताच ग्रामीण भागातील हॉटेल, धाबे, हाऊसफुल्ल झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असतांनाही जेवणावळीला गर्दी होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या हॉटेल्स व धाबा चालकांना मात्र, या निवडणुकीमुळे अच्छे दिन आले आहेत. ग्रामीण भागातील मतदार आता ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातच हॉटेलला मोठ्या प्रमाणात पसंती देऊ लागले आहेत.