शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : अजब कारभार; महिनाभरापूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीला कोरोना झाल्याचा आरोग्य विभागातून कॉल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 18:27 IST

Corona Virus : अंबाजोगाई शहरातील मंडी बाजार परिसरात राहणारे डॉ. धर्मेंद्र गुप्ता यांचे १४ एप्रिल रोजी कोरोनाचे उपचार सुरू असताना स्वाराती रुग्णालयात निधन झाले आहे.

ठळक मुद्देअचानकच १६ मे रोजी आरोग्य विभागाने कोरोना बधितांची यादी जाहीर केली.यादीमध्ये ५५ व्या क्रमांकावर धर्मेंद्र गुप्ता यांच्या नावाचा उल्लेख पॉझिटिव्ह रुग्ण म्हणून

- अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई : महिनाभरापूर्वी कोरोना बाधित झालेले मंडी बाजार परिसरातील डॉ. धर्मेंद्र गुप्ता यांचे उपचार सुरू असताना निधन झाले. या धक्क्यातून त्यांचे कुटुंबीय अद्याप बाहेर पडले नाहीत तोच त्यांच्या कुटुंबियांना धर्मेंद्र गुप्ता कोण आहेत, त्यांना कोरोना झाला असून पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णालयात पाठवा असे फोन त्यांच्या घरी खणानू लागले. जी व्यक्ती महिना भरापूर्वी कोरोनामुळे मृत्यू पावली तीच व्यक्ती पुन्हा कोरोनाबाधित निघाली. हा चमत्कार घडवला आहे आरोग्य विभागाने! या घटनेमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

अंबाजोगाई शहरातील मंडी बाजार परिसरात राहणारे डॉ. धर्मेंद्र गुप्ता यांचे १४ एप्रिल रोजी कोरोनाचे उपचार सुरू असताना स्वाराती रुग्णालयात निधन झाले. या घटनेला एक महिन्याच्या कालावधी लोटला आणि अचानकच १६ मे रोजी आरोग्य विभागाने कोरोना बधितांची यादी जाहीर केली. या जाहीर झालेल्या यादीमध्ये ५५ व्या क्रमांकावर धर्मेंद्र गुप्ता यांच्या नावाचा उल्लेख पॉझिटिव्ह रुग्ण म्हणून करण्यात आला आहे. तसेच, ते नवीन रुग्ण म्हणून निष्पन्न झाल्याचे अहवालात नमूद आहे.

जे व्यक्ती कोरोनाबधित होतात त्या व्यक्तींची यादी पडताळणीसाठी व त्यांनी उपचार घ्यावेत यासाठी पाठपुरावा करण्यात येतो. याकामी आरोग्य विभागागील कर्मचारी व शिक्षकांचे प्रभागनिहाय नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. नियुक्ती करण्यात आलेल्या शिक्षकांनी नेहमीप्रमाणे त्या व्यक्तीच्या नावासमोर असलेल्या मोबाईलवर फोन करून हा फोन धर्मेंद्र गुप्ता यांचा आहे का? ते कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यांना उपचारासाठी स्वाराती रूग्णालयात पाठवा असे फोन खानाणु लागले. डॉ. धर्मेंद्र गुप्ता यांचे निधन होऊन महिना लोटला. अजूनही त्यांचे कुटुंबीय या धक्क्यातून बाहेर पडले नाहीत. आशा स्थितीत मयत झालेल्या व्यक्तीला कोरोना झाल्याचा साक्षात्कार आरोग्य विभागाला झाला कसा ?

अहवालावर विश्वास ठेवायचा कसा?जर मयत व्यक्तीला महिन्यानंतर पुन्हा पॉझिटिव्ह घोषित करण्यात येत असेल तर अशा अहवालवर विश्वास कसा ठेवायचा असा सवाल उपस्थित होत आहे. अहवालातून इतरवेळेस अनेकदा पॉझिटिव्ह, निगेटिव्हचे चुकीचे निष्कर्ष देण्यात आले नसतील का अशी शंका विचारली जात आहे. अशा चुकांची गांभीर्याने दखल घेऊन सखोल तपासणी आवश्यक आहे.

ती आमची जबाबदारी नाहीआम्ही आरटीपीसीआर सँपल गोळा करण्याचे काम करत नाहीत, फक्त चाचणी करणे हे आमच्या प्रयोगशाळेचे काम आहे. आमच्याकडे आलेल्या सॅम्पलला कोड नंबर असतात. चाचणीनंतर रुग्णाच्या नावासह करण्यात येणाऱ्या यादीची जबाबदारी आमची नाही. - डॉ. संदीप निळेकर, विभागप्रमुख, सूक्ष्मजीवशास्त्र

सध्या कोरोनाबळीच्या प्रलंबित राहिलेल्या नोंदी वेबसाईटवर अद्यावत करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे अनवधानाने काही वेळेस जुन्या मयत रुग्णांची नावे पुन्हा यादीत येत आहेत. यानंतर अशा चुका होणार नाहीत याची दक्षता आम्ही घेऊ.- डॉ. बालासाहेब लोमटे, तालुका आरोग्य अधिकारी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBeedबीड