शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : एचआरसीटी स्कोअर १६, ऑक्सिजन लेव्हल ८८.. अन् बेड रिकामा करण्यासाठी दिला डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 12:00 IST

Corona Virus : याच रूग्णाला साधारण ७ वाजेच्या सुमारास डिस्चार्ज झाल्याचे सांगण्यात आले. वास्वतिक याच रूग्णाचा रेमडेसिवीरचा इंजेक्शनचा पाचवा डोस बाकी होता.

ठळक मुद्देबीडच्या जिल्हा रूग्णालयातील धक्कादायक प्रकारसीएस, एसीएसचा निष्क्रीय कारभार

बीड : एचआरसीटी स्कोअर १६, ऑक्सिजन लेव्हल ८८ असतानाही तसेच उपचार बाकी असतानाही केवळ बेड रिकामा करण्यासाठी घाई गडबडीत एका रूग्णाला डिस्चार्ज देण्याचा प्रकार जिल्हा रूग्णालयात झाला आहे. नातेवाईकांनी तक्रार करताच हा डिस्चार्ज रद्द करून पुढील उपचार चालू ठेवण्यात आले. परंतू या निमित्ताने जिल्हा रूग्णालयातील गलथान कारभार आणि जिल्हा शल्य चिकित्सक, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांचे ढिसाळ नियोजन चव्हाट्यावर आले आहे. 

वडवणी तालुक्यातील एक रूग्ण जिल्हा रूग्णालयातील वाॅर्ड क्रमांक ६ मध्ये १८ मे रोजी दाखल झाला. १९ तारखेपासून त्याला रेमडेसिवीर इंजेक्शन व इतर उपचार सुरू करण्यात आले. आरोग्य विभागावर विश्वास ठेवून नातेवाईक बाहेर थांबले. परंतू आतमध्ये ऑक्सिजन बंद  पडले तरी नर्स व इतर कर्मचारी लक्ष देत नसल्याचे उघड झाले होते. यात दोन नर्सवर निलंबणाची कारवाईही झाली होती. त्यानंतर याच रूग्णाचा २१ मे रोजी एचआरसीटी तपासणी केली असता स्कोअर १६ आला. तसेच ऑक्सिजन लेव्हलही कमी जास्त होती. उपचारही सुरूच होते. असे असतानाच रविवारी रात्रीच्या सुमारास बेड रिकामा करायचा म्हणून याच रूग्णाला चक्क डिस्चार्ज देण्यात आला. नातेवाईकांनी हा प्रकार वरिष्ठांना सांगितल्यानंतर डॉ.अशोक हुबेकर यांनी धाव घेत हा डिस्चार्ज रद्द केला. हा प्रकार मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनाही कळविण्यात आला. त्यानंतर आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली. 

९ वाजता इंजेक्शनचा पाचवा डोसयाच रूग्णाला साधारण ७ वाजेच्या सुमारास डिस्चार्ज झाल्याचे सांगण्यात आले. वास्वतिक याच रूग्णाचा रेमडेसिवीरचा इंजेक्शनचा पाचवा डोस बाकी होता. तो डिस्चार्ज रद्द केल्यानंतर ९ वाजता देण्यात आला. जर ७ वाजताच रूग्णाला सुटी दिली असती तर या इंजेक्शनचा काळाबाजार झाल्याशिवाय राहिला नसता, असा संशय व्यक्त होत आहे. 

सीएस, एसीएसचा निष्क्रीय कारभारजिल्हा रूग्णालयात सुविधा आणि उपचाराविना रूग्णांचे हाल होत असल्याचे अनेक प्रकरणांवरून समोर आले आहे. असे असले तरी सीएस व एसीएसला काहीच देणेघेणे नसल्याचे दिसत आहे. रोज शेकडो तक्रारी प्राप्त होऊनही यात सुधारणा होत नसल्याचे दिसते. या दोन्ही निष्क्रीय अधिकाऱ्यांमुळे आता संताप व्यक्त होत असून थेट मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्याकडे पुराव्यानिशी तक्रार करणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBeedबीड