शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : कामचुकारांना दणका; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आष्टीतील एका डॉक्टरसह सात जणांची केली हकालपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 11:29 IST

Corona Virus : आष्टी कोवीड सेंटरमधील रूग्ण बाहेर फिरतात, डॉक्टर, परचारिका उपचाराकडे दुर्लक्ष करतात, वॉर्डबॉय स्वच्छता करत नाहीत, अशा तक्रारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या

बीड : कोवीड सेंटरमध्ये थांबून रूग्णसेवा करण्यात हलगर्जी करणाऱ्यांना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी चांगलाच दणका दिला आहे. एका डॉक्टरसह सात जणांची थेट हकालपट्टी केली आहे. आष्टी कोवीड सेंटरला शनिवारी पहाटेच अचानक भेट देऊन डीएचओ डॉ. आर.बी.पवार यांनी ही कारवाई केली. त्यामुळे कामचुकारांचे धाबे दणाणले आहेत. 

आष्टी कोवीड सेंटरमधील रूग्ण बाहेर फिरतात, डॉक्टर, परचारिका उपचाराकडे दुर्लक्ष करतात, वॉर्डबॉय स्वच्छता करत नाहीत, अशा तक्रारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यांनी याची गंभीर दखल घेत शनिवारी सकाळीच आष्टी गाठत कोवीड सेंटरची तपासणी केली. यात त्यांना भरपूर त्रूटी दिसल्या. तसेच कामात हलगर्जी झाल्याचेही दिसले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता येथे कर्तव्यावर असणाऱ्या डॉ.माधूरी पाचरणे, या डॉक्टरसह अश्विनी पांतागणे, रूपाली काळे या दोन एएनएम आणि चार वॉर्डबॉयची हकालपट्टी केली. तसेच दुसऱ्या कर्मचाऱ्यांना तात्काळ बोलावून घेत रूग्णसेवा देण्याच्या सुचना प्र.तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नितीन मोरे यांना दिल्या. या कारवाईने मात्र, खळबळ उडाली आहे.

डीएचओंप्रमाणे सीएस का कारवाई करत नाहीत?उपचारातील हलगर्जी व सुविधांबाबतच्या तक्रारी प्राप्त होताच खात्री करून डीएचओ तात्काळ कारवाई करतात. तर दुसऱ्या बाजूला जिल्हा रूग्णालयात रूग्णांच्या जीवाशी खेळ खेळला जात असतानाही आणि याबाबत ढिगभर तक्रारी प्राप्त होऊनही जिल्हा शल्य चिकित्सक कारवाईला आखडता हात घेत आहेत. कामचुकारपणा करूनही कारवाई होत नसल्याने यात 'अर्थ'कारण झाल्याचा आरोप सामान्यांतून होत आहे. जिल्हा रूग्णालय प्रशासन सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे.

टॅग्स :Beedबीडcorona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टर