शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

कोरोना कहर ! अंबाजोगाईत एकाच चित्तेवर आठ जणांवर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 18:17 IST

Corona virus in Beed मरण झाले स्वस्त; दिवसागणिक परिस्थिती होऊ लागली बिकट

अंबाजोगाई :  शहरातील स्वाराती रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये दररोज शंभरच्या पुढे पॉझिटिव्हचा आकडा वाढत असताना मृत्यूचा दर देखील झपाट्याने वाढत आहे. स्वाराती रुग्णालयात सात व लोखंडीच्या कोविड सेंटरमधील एक अशा एकूण आठ कोविड मृतांवर नगरपालिका प्रशासनाने मांडवा रोडवरील स्मशानभूमीत एकाच सरणावर अग्निडाग देण्यात आला. मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने अंबाजोगाईत मरण स्वस्त झाले असेच म्हणावे लागेल. 

अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालय व लोखंडीच्या कोविड सेंटरमध्ये परळी, केज, धारूर, गंगाखेड, माजलगाव आदी तालुक्यातील रुग्ण कोरोनावरील उपचारासाठी येतात. कोविड केअर सेंटर मध्ये उपचारासाठी येणारे रुग्ण हे उच्च रक्तदाब, मधुमेह, श्वसनाचे विकार असे ६० ते ८० वयोगटातील रुग्ण उपचारासाठी येत असल्याने हे सर्व रुग्ण अंगावर आजार काढून जास्त झाल्यानंतरच रुग्णालय गाठतात त्यामुळे मृत्यूंची संख्या वाढू लागली आहे.

अंबाजोगाई तालुक्यात चार दिवसामध्ये पाचशेच्या जवळपास रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहेत. तरीदेखील नागरिक अजूनही गंभीर नसल्याचे दिसून येते. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत मृंचे प्रमाण कमी असले तरी अंबाजोगाई हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. सोमवारी मंगळवार पेठ, भटगल्ली, बोरखेड (परळी), लोखणी दावारागाव, अंबलटेक, आपेगाव, मंगरूळ (माजलगाव) व धारूर या आठ गावातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा सोमवारी मृत्यू झाला. मृत पावलेल्या रुग्णावर मंगळवारी दुपारी पठाण मांडवा रस्त्यावरील पालिकने निर्माण केलेल्या कोविड रुग्णांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी एकाच सरणावर आठ जणांना अग्निडाग देण्यात आला. या अतः मध्ये एक महिला असून सर्व रुग्ण ६० वर्षापुढील आहेत. 

अंबाजोगाईमध्ये मरण स्वस्त असेच म्हणावे लागले. कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असला तरी जिल्हाधिकाऱ्यांनी आज कठोर निर्बंध लादलेले असतानाही नागरिक गंभीर नसल्याचे दिसून आले. नेहमी प्रमाणेच शहरातील मुख्य रस्ते गजबजलेले दिसून आले. दरम्यान, आज दुपारी घाटनांदूर येथील एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून तिच्या पार्थिवावर उद्या बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शासनाच्या कठोर निर्बंधाचे पालन केले तर कोरोनाचा आकडा कमी होऊ शकतो असा दावा प्रशासनाने केला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBeedबीड