शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे क्षयरोग शोधमोहीम थंडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:25 IST

.... लोककलावंतांना आर्थिक मदत द्या वडवणी : कोरोनामुळे विविध कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे शहरी, ग्रामीण भागातील लोककलावंतांचे ...

....

लोककलावंतांना आर्थिक मदत द्या

वडवणी : कोरोनामुळे विविध कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे शहरी, ग्रामीण भागातील लोककलावंतांचे आर्थिक गणित बिघडले आहे. शासनाने लोककलावंतांना मदत करावी, अशी मागणी मोरनृत्य कलावंत जगन कलाल यांनी केली आहे.

...

बोगस बियाणे खरेदी करू नका

वडवणी : गेल्या वर्षी काही प्रमाणात बोगस बियाणे खरेदी करून लागवड झाली. मात्र, पुन्हा बोगस बियाणांविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या. यावर्षी खरीप हंगाम आता तोंडावर आला आहे. शेतकरी पेरणीची पूर्वतयारी करीत आहेत. खते, बियाणे घेताना त्याची खात्री करूनच खरेदी करावी. बियाणे बोगस असल्याचा संशय आल्यास तात्काळ कृषी विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी उद्धव गर्जे यांनी केले आहे.

....

धूरफवारणी करण्याची मागणी

वडवणी : शहरातील अनेक प्रभागात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने धूरफवारणी करावी, अशी मागणी होत आहे. शहरातील बाजारपेठेत, मुस्लीम मोहल्ला, मंदिर परिसर, बसस्थानक परिसर, शिक्षक काॅलनी, पाॅवरलूम गल्ली, पाटील गल्ली, राम मंदिर परिसर, अशा विविध भागांमध्ये डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोना साथीच्या प्रतिबंधासाठी शहरात जनजागृती केली जात आहे. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीही उपाययोजना आखाव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

.....

खरिपाची तयारी पूर्ण, पावसाची प्रतीक्षा

वडवणी : शेतकरी खरीप हंगामातील पेरणीसाठी सज्ज झाले आहेत. शेतकऱ्यांनी शेतीची मशागत पूर्ण केली आहे. जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीची तयारी पूर्ण केली आहे. रोहिणी नक्षत्र सुरू झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण पसरले आहे, लवकरच पावसाची हजेरी लागणार असल्याचे सांगितले जात असल्याने शेतकरी आभाळाकडे डोळे लावून जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

....

स्वच्छता मोहीम रखडली

वडवणी : शहरातील गलोगल्ली नाल्यांची अनेक दिवसांपासून स्वच्छता मोहीम रखडली आहे. नाल्यामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. नाल्यांचे व्यवस्थापन बरोबर नसल्यामुळे शहरातील गल्लीचे सांडपाणी नाल्यात न जाता रस्त्यावर जमा होत आहे. त्यामुळे रस्त्यावर नेहमी घाण साचलेली असते. ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येत आहे. आता काही दिवसांत पावसाळा सुरू होणार असून, त्यापूर्वी नाल्यांची सफाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.