तालुक्यातील आंबेवडगाव परिसरात गहू पिकावर तांबेरा रोग पडल्याने गहू पिवळा पडू लागला आहे. या वर्षी भरपूर प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी रबी गव्हाची लागवड केली आहे. वातावरण बदलामुळे मावा, चिकटा असे रोग गहू, ज्वारीवर पडले आहेत. गहू पिवळा पडून वाढ खुंटलेली आहे. डाळिंब तसेच आंब्याच्या माेहरावरही किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. डाळिंबाची शेंडे पूर्णतः चिकट्यामुळे जळून गेले आहेत. महागडी औषधे फवारूनही चिकटा कमी होत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
उत्पन्नापेक्षा खर्च दुप्पट वाढला आहे. पेरणी, कुळवणी, खुरपणी तीन वेळस पुन्हा काढणी, पिकाला चार दिवसाला पाणी देणे याची मजुरी काढली, तर शिल्लक काहीच राहत नसल्याचे गोरक्षनाथ घोळवे यांनी सांगितले.
चिकटा व मावामुळे पिकांचे नुकसान
या वर्षी दोन बॅग गहू पेरला. डाळिंब दीड एकर आहे. वातावरण बदलामुळे सतत चिकटा, मावाचा प्रादुर्भाव आहे. उपाय करूनही उपयोग होत नाही. पिकांची वाढ खुंटली आहे. यामुळे मोठे नुकसान होणार असल्याचे शेतकरी बालाजी वाघमोडे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी
अंडील
वातावरण बदलामुळे चिकटा, मावा हा रोग पडत यापासून संरक्षणासाठी कृषी विभागाकडून माहिती घेऊन दक्षता घ्यावी व पिकांचे रक्षण करावे, असे अवाहन कृषी सहायक श्रीनिवास अंडील यांनी केले.