शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

मृतदेहाची अवहेलना; गावात नेलेला मृतदेह पुन्हा रुग्णालयात आणला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:35 IST

बीड : २४ दिवस कोरोनाबाधित म्हणून मृत्यूशी झुंज दिली. सोमवारी पहाटेच्या ती अपयशी ठरली. त्यानंतर पुन्हा चाचणी केली असता ...

बीड : २४ दिवस कोरोनाबाधित म्हणून मृत्यूशी झुंज दिली. सोमवारी पहाटेच्या ती अपयशी ठरली. त्यानंतर पुन्हा चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली. त्यामुळे नातेवाइकांकडे मृतदेह सुपूर्द केला. परंतु अचानक कोणी तरी तक्रार केली आणि सर्व यंत्रणा कामाला लागली. त्यामुळे गावात गेलेला मृतदेह पुन्हा रुग्णालयात आणून पालिकेने अंत्यसंस्कार केले. यात सर्व प्रशासनाची चूक असतानाही केवळ दादागिरी करत मृतदेह पळविल्याचा बनाव करीत नातेवाइकांवरच गुन्हा दाखल केला आहे. या प्रकाराने तीव्र रोष व्यक्त होत आहे.

गेवराई तालुक्यातील कुंभारवाडी येथील ३२ वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळली. तिला जिल्हा रुग्णालयातील वाॅर्ड क्रमांक ५ मध्ये दाखल केले. रविवारी मध्यरात्री तिची प्रकृती अचानक खालावली आणि सोमवारी पहाटेच्या सुमारास तिची प्राणज्याेत मालवली. आयसीएमआरच्या नियमानुसार पॉझिटिव्ह मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला जात नाही. त्यामुळे या महिलेची पुन्हा ॲंटिजन तपासणी करण्यात आली. यात ती निगेटिव्ह आली. त्यामुळे नातेवाइकांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह ताब्यात घेतला आणि अंत्यसंस्कारासाठी कुंभावाडीला नेला. परंतु तोपर्यंत इकडे काही लोकांनी आरडाओरड केला. ही माहिती तत्काळ जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हाधिकारी यांना देण्यात आली. त्यांनी पोलिसांना संपर्क करून मृतदेह परत बोलावून घेतला. नंतर आयसीएमआरच्या नियमानुसार नगरपालिकेने अंत्यसंस्कार केले.

दरम्यान, हा सर्व प्रकार अंगलट येणार हे लक्षात आल्यावर येथील अधिकाऱ्यांनी परिचारिकेला पुढे करीत नातेवाइकांविरोधात फिर्याद देण्याबाबत दबाव टाकला. त्यानंतर पिंगळे नामक परिचारिकेच्या फिर्यादीवरून बीड शहर पोलीस ठाण्यात मयताच्या पतीसह इतर नातेवाइकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

दहा दिवसांत कोरोनामुक्त

आयसीएमआरच्या नियमानुसार एखादी व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्यावर दहा दिवसांत त्याला काही लक्षणे नसल्यास कोरोनामुक्त घोषित केले जाते. या महिलेची प्रकृती चिंताजनक होती. यात ती दगावली. तब्बल २४ दिवस झालेले असल्याने तिची ॲंटिजन चाचणी केली असता निगेटिव्ह आली. त्यामुळे हरकत न घेता मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देता येतो. परंतु आरोग्य विभाग व प्रशासनाने दादागिरी करत उलट नातेवाइकांवरच गुन्हा दाखल केला. याबाबत सर्वस्तरातून संताप व्यक्त होत आहे.

वॉर्डबॉयने आणला मृतेदह, पोलीसही गेटवर तैनात

पिंगळे नामक परिचारिकेने मृतदेह पळविल्याची फिर्याद दिली आहे. वास्तविक पाहता वॉर्डमधून रुग्णवाहिकेपर्यंत हा मृतदेह रुग्णालयाच्याच लोकांनी आणला आहे. तसेच मुख्य गेटवर सर्व पोलीसही उपस्थित होते. सर्वांच्या साक्षीने नेलेल्या मृतदेहाला पळविले कसे म्हणता येईल? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

काय म्हणतात नातेवाईक..

कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याने सर्व कारवाई पूर्ण करूनच मृतदेह नेला. प्रशासन चुकीच्या पद्धतीने कारवाई करीत आहे. मृतदेह पळवून न्यायला ती काय वस्तू आहे का? सर्व कागदपत्रे पाहिल्यावर खरे काय तर समोर येईल, असे मयताच्या नातेवाइकांनी सांगितले.

याला जबाबदार कोण? काय करतेय यंत्रणा

आठवड्यापूर्वीच एका महिलेचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला होता. हा प्रकारदेखील असाच होता. आता यात मृतदेहाची अवहेलना झाली. याला प्रशासन की नातेवाईक यापैकी कोण जबाबदार आहे. मृतदेह खरोखरच पळविला असेल तर यंत्रणा काय करतेय? असा सवाल उपस्थित होत आहे.

काय म्हणतात, एसीएस राठोड...

याबाबत अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड म्हणाले, संंबंधित महिला कोरोना पॉझिटिव्ह होती. सोमवारी मयत झाल्यावर तिची ॲंटिजन चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली, हे खरे आहे. परंतु तिला पॉझिटिव्हचे लेबल लागलेले होते. आयसीएमआरचे नियम काय तर पहावे लागतील. संबंधित नातेवाइकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी सांगितलेले आहे. चाचणी निगेटिव्ह असल्यावर मृतदेह ताब्यात देणे चूक की बरोबर, मृतदेहाची अवहेलना आणि कारवाईला जबाबदार कोण? असे विचारताच डॉ. राठोड यांना उत्तर देता आले नाही.