शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण अवघडच; २०२२ संपेपर्यंत झाले तरी मिळविले..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:25 IST

बीड : केंद्रीय मंत्र्यांनी डिसेंबर अखेरपर्यंत कोरोना लसीकरण पूर्ण होईल, असा दावा केला आहे. परंतु, जिल्ह्यात सध्या लसीकरण अतिशय ...

बीड : केंद्रीय मंत्र्यांनी डिसेंबर अखेरपर्यंत कोरोना लसीकरण पूर्ण होईल, असा दावा केला आहे. परंतु, जिल्ह्यात सध्या लसीकरण अतिशय संथगतीने सुरू आहे. त्यामुळे डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण करणे तर अवघडच आहे, परंतु, २०२२ संपेपर्यंत पूर्ण झाले तरी मिळविले, अशी म्हणण्याची वेळ आहे. हे आव्हान वेळेत पूर्ण करण्यासाठी लसीचा मुबलक साठा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

जिल्ह्याची लोकसंख्या ३१ लाखांवर आहे. त्यात १८ ते ४४ वयोगटांतील लोकांची संख्या १२ लाख ९४ हजार एवढी आहे तर त्यापुढील ८ लाख १९ हजार ५३३ एवढी आहे. लसीकरणासाठी एवढे लोक पात्र असतानाही आतापर्यंत केवळ ३ लाख ८५ हजार लोकांना लस टोचण्यात आली आहे. त्यात दोन्ही डोस घेतलेल्यांचा आकडा केवळ ९१ हजार ७१६ एवढा आहे. मागील काही दिवसांपासून तर १८ ते ४४ वयोगटांतील लसीकरण थांबवलेले आहे. केवळ ४५ वर्षांवरील लोकांना लस दिली जात आहे. केवळ लसीचा मुबलक पुरवठा होत नसल्याने जिल्हास्तरावर लसीकरण संथगतीने सुरू आहे. एकीकडे लसीचा तुटवडा असल्याने लसीकरण संथ होत आहे तर दुसऱ्या बाजूला केंद्रीय मंत्र्यांनी डिसेंबर अखेरपर्यंत लसीकरण पूर्ण केले जाईल, असे स्पष्ट केले आहे. अशीच जर गती राहिली तर डिसेंबरअखेर तर सोडाच परंतु २०२२ मध्ये जरी लसीकरण पूर्ण झाले तरी आरोग्य विभागाचे यश समजावे लागेल.

दरम्यान, ४५ वर्षांवरी लोकांना केंद्राकडून तर १८ ते ४४ वयोगटांतील लाेकांना राज्यस्तरावरून लस पुरविली जाते परंतु राज्यस्तरावरून लस मिळत नसल्याने हे लसीकरण बंद आहे. त्यामुळे या गटातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. लसीकरण वेळेत पूर्ण झाले नाही तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे लस उपलब्ध करून लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करण्याची मागणी होत आहे.

अगोदर १४३ केंद्र, आता ७१

जिल्ह्यात १८ वर्षांवरील लोकांना लस दिली जात होती, तेव्हा गर्दी टाळण्यासाठी उपकेंद्र ते जिल्हा रुग्णालय अशी तब्बल १४३ केंद्रे तयार केली होती परंतु, आता लस उपलब्ध होत नसल्याने केवळ ७१ केंद्र ठेवले आहेत. त्यातही काहीच केंद्र पूर्णवेळ सुरू राहतात, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

--

१८ ते ४४ वयोगटांतील लसीकरण बंद आहे. ४५ वर्षांवरील लोकांना ऑनलाईन नोंदणी करून लस दिली जात आहे. शासनाकडून जसी लस उपलब्ध होईल, तसे लसीकरण केले जात आहे.

- डॉ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड

---

आतापर्यंत झालेले लसीकरण

पहिला डोस २,९४,१८३

दुसरा डोस ९१,७१६

एकूण लसीकरण ३,८५,८९९