शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव दराने खतांची विक्री होत असल्यास तक्रार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:35 IST

अंबाजोगाई : छापील किमतीपेक्षा वाढीव दराने रासायनिक खते विक्री होत असल्यास थेट तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून रीतसर ...

अंबाजोगाई :

छापील किमतीपेक्षा वाढीव दराने रासायनिक खते विक्री होत असल्यास थेट तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून रीतसर लेखी तक्रार करावी. निश्‍चितपणे संबंधित दुकानदारांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी आर. डी. बर्वे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

नवे दर लागू झालेले रासायनिक खते अंबाजोगाई येथेच काय परंतु अद्याप राज्यात दाखल झाले नाहीत, तरीही बाजारात मात्र जुन्या दरातील रासायनिक खते कच्चे बिल देत वाढीव पैसे घेऊन विक्री होत असल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत. तालुका कृषी अधिकारी यांनी याबाबत वेळीच लक्ष्य घालणे आवश्यक आहे.

खरीप हंगामाच्या पेरणीच्या दृष्टिकोनातून तालुक्यातील शेतकरी पेरणीसाठी आवश्यक असलेले रासायनिक खते, बियाणे खरेदी करण्यासाठी मोंढा बाजारात गर्दी करीत आहेत. रासायनिक खतांच्या पोत्यावर असलेल्या छापील किमतीपेक्षा जादा पैसे आकारले जात आहेत. अशा तक्रारी शेतकऱ्यांनी केल्यात. त्याचबरोबर पावती दिली जात नाही. दिलीच तर साध्या कागदावर दिली जाते.

येत्या खरीप हंगामासाठी कृषी सेवा केंद्रावर रासायनिक खते खरेदी करतेवेळी कोणताही वितरक किंवा दुकानदार छापील किमतीपेक्षा जास्तीच्या दराने विक्री करीत असतील तर त्यासंबंधी कृषी विभागाकडे लेखी स्वरूपात तक्रार करावी. किंवा संपर्क साधावा. कोविड -१९ च्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी न करता जास्तीत जास्त शेतकरी गटांमार्फत खतांची एकत्रित खरेदी करावी.

...

पक्की पावती घ्या

खरेदी करतेवेळी खरेदीची पक्की पावती घ्यावी. जर कोणताही खत विक्रेता खरेदीची पक्की पावती देण्यासंबंधी नकार देत असेल तर कृषी विभागातील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी तालुका कृषी अधिकारी बर्वे यांनी केले आहे.

...