बीड : शहरातील यशवंत विद्यालयात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत संपादन केलेल्या व सामाजिक क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव गोविंदराव वाघ, तर प्रमुख अतिथी शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे, उपशिक्षणाधिकारी नानाभाऊ हजारे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक गणेश वाघ, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक एम.एस. धुमाळ हे उपस्थित होते.
यावेळी शाळेतून प्रथम क्रमांक प्राप्त प्रणव वाघ, द्वितीय क्रमांक ओमकार जानवळे, तृतीय क्रमांक अंशू राम दामोदर, सूरज भगत, रेणुका पिंगळे, माजी विद्यार्थी नीलेश कागदे, महेश भांडवले, मयुरी वायचळ यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी साईनाथ ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांना जीवनात त्रिसूत्रीचे महत्त्व विशद करत, व्यसन करू नका. आई-वडिलांची सेवा, तसेच राष्ट्रसेवा यातून व्यक्तिमत्त्व संपन्न होते, असे सांगितले. नानाभाऊ हजारे यांनी, विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्य केले पाहिजे, असे सांगत विविध उदाहरणे दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष गोविंदराव वाघ यांनी विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण अभ्यास आवश्यक असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन के.बी. गाडेकर यांनी केले. एस.जी. गीते यांनी आभार मानले.
240721\0010202924bed_2_24072021_14.jpg
यशवंत विद्यालय