शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

मांजराचे चार दरवाजे बंद, दोन दरवाजांतून विसर्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:39 IST

अंबाजोगाई : बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील बहुतांशी भागाचा प्रमुख जलस्रोत असणारा मांजरा प्रकल्प २१ सप्टेंबर रोजी दुपारी तुडुंब ...

अंबाजोगाई : बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील बहुतांशी भागाचा प्रमुख जलस्रोत असणारा मांजरा प्रकल्प २१ सप्टेंबर रोजी दुपारी तुडुंब भरल्याने कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. मात्र दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसाने धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली. त्यामुळे २२ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले होते. २३ सप्टेंबर रोजी मांजरा धरणात नदीपात्राद्वारे येणाऱ्या पाण्याचा प्रवाह कमी झाल्यामुळे चार दरवाजे बंद करण्यात आले असून दरवाजा क्र. १ आणि ६ हे २५ सेंमी उघडण्यात आले आहेत.

मांजरा धरणाची साठवण क्षमता २२४ दलघमी आहे. बुधवारी सकाळपर्यंत या धरणात २२३.६२५ दलघमी साठा होता. त्यानंतर धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने मंगळवारी उजव्या कालव्यातून १.२७ प्रति से.घ.मी. वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता, तर दुपारनंतर मुसळधार पाऊस झाल्याने धरणात पाण्याची आवक वेगाने वाढली. बुधवारी पहाटेपर्यंत धरणात २२५.५ दलघमी पाणीसाठा झाला. त्यामुळे सकाळी ६ धरणांचे सहा दरवाजे उघडण्यात आले. प्रति सेकंद १४९.८० घनमीटर वेगाने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला होता. सहा वर्षांच्या दुष्काळानंतर २०१६ साली झालेल्या मुसळधार पावसाने या धरणाचे धरणाचे दरवाजे उघडण्याचा योग आला होता. त्यानंतर अपवाद वगळता नियमितपणे हे धरण प्रतिवर्षी पूर्ण क्षमतेने भरत आहे. यंदाही निसर्गाने भरभरून दान दिल्यामुळे सलग तिसऱ्या वर्षी हे धरण तुडुंब भरले असून दरवाजे सलग तिसऱ्या वर्षीही उघडण्याचा सुखावह प्रसंग अनुभवण्यास मिळाला आहे. या विभागातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

230921\1642-img-20210923-wa0112.jpg

मांजरा दोन दरवाजा मधून विसर्ग