शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पात्रुड जवळील पूल ठरतोय धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : तालुक्यातील पात्रुड-जीवनापूर रोडवरील पात्रुड जवळील पुलाचे गेल्या दीड वर्षांपूर्वी आमदार प्रकाश सोळंके यांच्या हस्ते ...

लोकमत न्यूज नेटवर्क

माजलगाव : तालुक्यातील पात्रुड-जीवनापूर रोडवरील पात्रुड जवळील पुलाचे गेल्या दीड वर्षांपूर्वी आमदार प्रकाश सोळंके यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले होते. या पुलाचे काम सुरू झाले परंतु ते अर्धवट आहे. यामुळे हा पूल अपघातास निमंत्रण देणारा ठरत आहे. दरम्यान, रविवारी झालेल्या पावसाने पुलावरुन पुराचे पाणी वाहिले. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता.

पात्रुड-जीवनापूर राज्य रस्त्याचे काम

अनेक महिने रखडल्यानंतर चार महिन्यापूर्वी हे काम पूर्ण झाले. तर पात्रुड जवळील पुलाचे काम चालू होऊन दीड वर्षे झाले. अर्धवट पूल होताच हे काम संबंधित गुत्तेदाराने थांबवले आहे. यामुळे या रस्त्यावर येणाऱ्या गावातील नागरिकांना पावसाळ्यात या ठिकाणाहून जाण्यास कसरत करावी लागते. या पुलावरुन बेलुरा, आलापूर, लोणगाव, जीवनापूर, देवळासह अनेक गावातील नागरिकांना जावे लागते. या पुलाचे अर्धवट काम झाले असल्याने याठिकाणी दररोज होत आहेत. याठिकाणाहून जाताना वाहन चालकास कसरत करावी लागते.

.....

सार्वजनिक बांधकामचे दुर्लक्ष

रविवारी झालेल्या पावसामुळे येथे पूर आला. यामुळे या अर्धवट पुलावरून पाणी वाहू लागल्याने अनेक गावचा इतर गावाशी संपर्क तुटला होता. याबाबत या भागातील नागरिकांनी आमदार सोळंके व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. तरीही या कामाबाबत कसल्याच प्रकाराची दखल घेतली नसल्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. तरी या पुलाचे काम लवकरात लवकर करावे, अशी मागणी होत आहे.

===Photopath===

140621\purusttam karva_img-20210614-wa0034_14.jpg

===Caption===

पात्रुड-जिवनपूर मार्गावर पात्रुडजवळ  अर्धवटस्थितीत असलेला पूल.