येथील जिजामाता चौकात झालेल्या महाआरोग्य सर्वरोगनिदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, सागर धस, चंपाबाई पानसंबळ, दशरथ वनवे, जि.प. सदस्य शिवाजी पवार, अशोक सव्वासे, सुरेश उगलमुगले, डॉ. मधुसूदन खेडकर, पं.स. सभापती उषा सरवदे, माजी सभापती राणी बेदरे, आश्रुबा खरमाटे, डॉ. रमणलाल बडजाते, प्रभारी तहसीलदार शिवाजी पालेवाड, गटविकास अधिकारी बळीराम चव्हाण आदी उपस्थित होते. महाआरोग्य शिबिराचे आयोजन राणी बेदरे,अशोक मोरे, पांडुरंग अभंग यांनी केले होते. या शिबिरात ५७ जणांनी रक्तदान केले. ६२ जणांची सोनोग्राफी करण्यात आली. नेत्र तपासणी केलेल्या १६८ पैकी ३३ रुग्णांवा शस्रक्रिया केली जाणार आहे. १४५ जणांची रक्त व लघवी तपासणी करण्यात आली. २३ लहान मुलांचीही तपासणी करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. शिबिर यशस्वीतेसाठी निवृत्ती बेदरे, कल्याण तांबे, आप्पा येवले आदींनी परिश्रम घेतले. यावेळी प्रथम नगराध्यक्ष रोहिदास पाटील, दत्ता पाटील, उपनगराध्यक्ष प्रकाश देसरडा, गणेश भांडेकर, पोपट कनुजे, प्रल्हाद धनगुडे, राजू घोरपडे, बबनराव मोरे, बाबासाहेब नेटके, दत्ता तांबे, वैजीनाथ खेडकर यांच्यासह सर्व नगरसेवक, पंचायत समिती सदस्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचलन कल्याण तांबे यांनी केले. प्रास्ताविक निवृत्ती बेदरे यांनी केले. पांडुरंग अभंग यांनी आभार मानले.