शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्हा बँक प्रकरणी लातूरमध्ये सुनावणी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:33 IST

बीड : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत सेवा सोसायटी मतदार संघातून उमेदवारांचे ८३ अर्ज अपात्र ठरल्यानंतर ...

बीड : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत सेवा सोसायटी मतदार संघातून उमेदवारांचे ८३ अर्ज अपात्र ठरल्यानंतर त्यांनी लातूर येथील विभागीय सहनिबंधकांकडे धाव घेतली आहे. गुरुवारी ७३ अर्जदारांच्या अर्जांवर दोन्ही बाजूने सुनावणी सुरू होती. विभागीय सहनिबंधकांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सेवा सोसायटी मतदार संघातून ८३ उमेदवारी अर्ज दाखल झाले हाेते. अर्ज छाननीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी संबंधित उमेदवारांच्या साेसायटींचा ऑडिट वर्ग अ व ब नसल्याने उपविधीचे अनुपालन करीत उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरवले होते. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक चर्चेत आली. सेवा सोसायटी मतदार संघातून सर्वच तालुक्यातून उमेदवारी अर्ज अपात्र ठरल्याने ११ जागांबाबत पेच निर्माण झालेला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाला संबंधित उमेदवारांनी विभागीय सहनिबंधक, लातूर यांच्या न्यायालयात दाद मागितली.

विभागीय सहनिबंधक, लातूर श्रीकांत देशमुख यांच्या न्यायालयात अपील दाखल केलेल्या संबंधित ७३ उमेदवारांनी त्यांच्या वकिलांमार्फत बाजू मांडली. सहकार मंत्र्यांनी दिलेल्या निर्णयाचा संदर्भ देत युक्तिवाद केला. १३ मे २०१५ रोजी सहकार मंत्र्यांनी दिलेला स्थगितीचा निर्णय कायम गृहीत धरावा, अशी मागणी या उमेदवारांच्या वतीने करण्यात आली.

तर निवडणूक अधिकाऱ्यांनी अपात्र ठरविलेला निर्णय कायम ठेवत उमेदवारांचे अपील फेटाळून लावण्याची मागणी आक्षेपार्थी अरूण वाघमारे, पुष्पा तिरोडमल, श्रीराम अरगडे यांच्या वतीने करण्यात आली. त्यांच्या वतीने ॲड. संजय देशमुख यांनी काम पाहिले. गुरुवारी दोन्ही पक्षांच्या वतीने बाजू मांडण्यात आली. आता विभागीय सहनिबंधक कोणता निर्णय देतात, याकडे लक्ष लागले आहे.

-------

सन २०१५ मध्ये धनराज राजाभाऊ मुंडे यांनी अपील दाखल करून बँकेच्या ३५ (५) उपविधीतील सेवा सोसायटीच्या लेखा परीक्षण दर्जाबाबतच्या तरतुदीला स्थगिती मागितली होती. तत्कालीन सहकार मंत्र्यांनी स्थगिती दिली होती. त्यानंतर निवडणूक झाली होती. हा स्थगिती आदेश कायम समजला जातो की, नाही याबाबत निर्णयाची प्रतीक्षा आहे. ७ मार्चपर्यंत विभागीय सहनिबंधकांचा निर्णय अपेक्षित आहे.

-------

दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत १० मार्चपर्यंत नामनिर्देशपत्र मागे घेता येणार आहेत. तर १२ मार्च रोजी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप होऊन यादी प्रसिद्ध होणार आहे.

--------------